Published On : Tue, Mar 9th, 2021

केटीनगर रुग्णालय मध्ये महिला दवाखाना – सूतिकागृह सुरु करावे : महापौर

Advertisement

नागपूर : महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी (९ मार्च) रोजी के.टी.नगर परिसरातील नागपूर महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केन्द्राची पाहणी केली. के.टी.नगर रुग्णालयात महानगरपालिकेचे महिला दवाखाना व सूतिकागृह सुरु करण्यासाठी व्यवस्था करणे तसेच रुग्णांसाठी लिफ्ट लावण्यासाठी मनपाच्या पुढच्या बजेटमध्ये प्रावधान करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. यावेळी त्यांचे समवेत वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती उपसभापती श्री. विक्रम ग्वालबंशी उपस्थित होते.

महापौरांनी सांगितले की या भागात गरीब लोकांची मोठी वसाहत आहे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी मनपाचे प्राथमिक आरोग्य केन्द्र सध्या कार्यरत आहे. या रुग्णालयात महिलांसाठी दवाखाना व सूतिकागृह सुरु केल्यानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

महापौरांनी के.टी.नगर येथे सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिस-या टप्प्याची पाहणी केली. त्यांनी उपस्थित डॉ. धिंगरा, डॉ. त्रिवेदी, नर्सेस आणि स्टाफचे कौतुक केले. येथे दररोज ४०० लोकांना लस दिली जात आहे. महापौरांनी नागरिकांशीसुध्दा संवाद साधला.

महापौरांनी सकाळी आयुर्वेदिक ले-आऊट येथील कोरोना चाचणी केन्द्रालाही आकस्मिक भेट दिली. महापौरांना नागरिकांनी चाचणी केन्द्राबददल काही तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने मनपा तर्फे काय व्यवस्था करण्यात आली याचा निरीक्षणासाठी महापौर तिथे गेले होते. नागरिकांची मागणी अनुसार महापौरांचा आदेशावर नेहरुनगर झोन तर्फे बॅरिकेडिंग करणे, टीन लावणे, शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नागरिकांसाठी ग्रीन मंडप टाकण्यात आला आहे. महापौरांनी आरोग्य सेवकांसाठी कुलर ची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. यावेळी महापौरांसोबत नेहरुनगर झोनचे सहाय्यक आयुक्त श्री. हरिष राऊत, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी आदी उपस्थित होते.