Published On : Tue, Mar 9th, 2021

मंगळवारी ९ प्रतिष्ठानांवर कारवाई

Advertisement


नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. ९ मार्च) रोजी ९ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. ५०,००० चा दंड वसूल केला. पथकानी ९७ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.