Published On : Fri, Jul 26th, 2019

पाणी पुरवठा होत नसल्यामुळे महिलांचा मोर्चा

कन्हान : – नगरपरिषद कन्हान – पिपरी अंतर्गत लेबरकँम्प सत्रापुर प्रभाग क्र २ येथील नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांनी नगरपरिषद ला मोर्चा नेऊन नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी केली.

नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत लेबरकॅम्प सत्रापुर प्रभाग क्रं २ येथील नागरिकांना पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे श्री मल्लेश रेड्डी यांच्या नेतृत्वात महिलांचा मोर्चा नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात धडकला असता मोर्च्याला प्रभाग क्रं २ चे नगरसेवक राजेश यादव सामोरे जाऊन नागरिकांना आस्वस्त केले. त्यांचे निवेदन पाणी पुरवठा प्रमुख फिरोज बिसेन यांनी स्वीकारले.

याप्रसंगी रवि भाऊ रंग, प्रमोद बांते, सौ पापमा भोंगी, रेनी बुडबी, सौ उषा रेड्डी, सौ वासनिक, सौ ठाकरे, कुसुम वाहणे, सौ वाघमारे, सौ गौरी रेड्डी सह लेबर कँम्प येथील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होऊन व्यवस्थित पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.