Published On : Fri, Jul 26th, 2019

पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियाना च्या माध्यमातून वंचित कुटुंबाना मिळणार लाभ – तहसीलदार नीलिमा रंगारी यांचे प्रतिपादन

Advertisement

रामटेक तहसील कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन.

रामटेक-रामटेक तहसील कार्यालयामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत रामटेक व पारशिवनी तालुक्या साठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला सदर कार्यक्रमात आपल्या भाषणात शेवटचा घटका प्रयत्न गॅस पुरवठा करून धूर मुक्त महाराष्ट्र या संकल्पना पूर्णत्वास नेवू व पात्र सर्व लोकांना अन्न धान्य पुरवठा होईल या साठी प्रयत्न करा असे आवाहन तायडे यांनी यावेळी केले .

तहसिलदार निलिमा रंगारी, प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत शेंडे , निरीक्षण अधिकारी स्वप्नील पडोळे , पुरवठा निरीक्षक अतिश जाधव, नागार्जुन खैरे रामटेक व पारशिवनी चे रास्त भाव दुकान दार, गॅस एजेन्सी चे प्रतिनिधी व अनुलोम चे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बोलताना तायडे यांनी समाजातल्या सर्व घटका पर्यन्त जाऊन काम करुन सदर अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले, तहसीलदार नीलिमा रंगारी यांनी सुध्दा सदर योजने बाबत चे महत्व विशद केले पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियाना च्या माध्यमातून वंचित कुटुंबाना लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार नीलिमा रंगारी यांनी हयाप्रसंगी केले .

सर्वानी मिळून एक जुटीनि काम करून या अभियान अंतर्गत वंचित कुटुम्बाना लाभ मिळणार असून या अभिनयाच्या माध्यमातून वंचीत कुटुम्बाना शिधापत्रिका व गैस कनेक्षन मिळणार असल्याचे प्रतिपादन ह्यप्रसन्गी केले . कार्यक्रमाच्या दरम्यान लाभार्थ्यांना गॅस व शिधापत्रिका यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पुरवठा निरीक्षक अतिश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन तितीक्षा बारापात्रे यांनी केले. कार्यक्रमाला मोठया प्रमानात लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.