Published On : Fri, Jul 26th, 2019

हज यात्रेकरूंचा दुसरा जथथा रवाना

कामठी :-मुस्लिम समाज बांधवांच्या हज यात्रेला सुरुवात झाली असून हज यात्रेकरूंचा दुसरा जतथा काल एअर इंडियाच्या विशेष विमानाने जेद्दाहसाठी रवाना झाले .सौदी अरब येथील मक्का मदिना येथील हज यात्रेला सुरुवात झाली असून 44 दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी हज यात्रेकरूंचा दुसरा जत्थ काल नागपूर विमानतळाहून रवाना झाले .यावेळी हज यात्रेकरूंचे मेडिकल फिटनेस, प्रमाणपत्र पाहून पासपोर्ट,विजा, विमानाचे तिकीट, ई-ब्रेसलेट, कडा, बोडिंग पास आदी साहित्य देण्यात आले.

तसेच हज यात्रेला जाणाऱ्या अनुयायांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली त्यानंतर यात्रेकरूंना जेददाहला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विशेष विमानात बसविण्यात आले.यावेळी हज यात्रेला जाणाऱ्या अनुयायांना शुभेच्छा देण्यासाठी ऑल इंडिया हज कमिटीचे सदस्य व पूर्व अध्यक्ष महाराष्ट्र हज कमिटी चे पूर्व अध्यक्ष हाजी इब्राहिम भाईजान, शोभि भाई, कामठी नगर परिषद चे नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत, डॉ नौशाद सिद्दीकी, माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, नगरसेवक नीरज लोणारे, आतिफ कुरेशी, निजाम्मूदिन अन्सारी, जावेद भाई, वकार अन्सारी, तौफिक कुरेशी, अजहर भाई, इजहार भाई, फजलुर रहमान कुरेशी, मोहम्मद मोहसीन , रिजवाण शेख, विक्की सिंघानिया आदी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी