Published On : Fri, Mar 6th, 2020

जिजाऊ ब्रिगेड कन्हान व्दारे ०८ मार्च ला महिला दिनी विविध कार्यक्रम

कन्हान : – समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे जिजाऊ ब्रिगेड कन्हान व्दारे ०८ मार्च जागतिक महिला दिनी विविध महिलांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ करूणा ताई आष्टणकर नगराध्यक्षा तर प्रमुख अतिथी म्हणुन नगरपरिषद कन्हान च्या सर्व नगरसेविका आमंत्रित आहेत. या प्रसंगी समाजातील जेष्ट कष्टकरी महिलां चा सत्कार, मुली व महिला करिता वेश भुषा स्पर्घा, नुत्य स्पर्धा तसेच अॅड. मनिषाताई पारधी यांचे महिलांचे हक्क व अधिकार यावर कायदेविषयक प्रबोध न आणि महिलांच्या आरोग्य विषयक काळजी यावर डॉ स्वाती वैद्य आणि योगा बाबद जिजाऊ ब्रिगेड सचिव छाया ताई नाईक हया मार्गदर्शन करणार आहे.

असा भरगच्छ कार्यक्रम रविवार ०८ मार्च ला दुपारी १२ ते ४ वाजेपर्यत आयो जित करून अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. करिता कन्हान परिसरातील महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा माया ताई इंगोले हयांनी केले आहे.