Published On : Wed, Apr 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

महिला पोलीस हवालदारावर पतीकडून अत्याचाराचा आरोप; नंदनवन ठाण्यात गुन्हा दाखल

Advertisement

नागपूर : शहरातील एका महिला पोलीस हवालदारावर तिच्याच पतीने अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थंडपेयामध्ये नशिले पदार्थ मिसळून जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला असून, या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सुमारे ४० वर्षांची असून ती शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. कौटुंबिक वादामुळे ती सध्या माहेरी राहत असून, तिची दोन लहान मुले पतीकडे आहेत. पती दिनेश याच्याशी पटत नसल्याने तिने यापूर्वीही इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती तसेच न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

१९ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९ वाजता पीडित महिलेने मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त करत पतीला फोन केला. त्यानंतर पतीने तिला नंदनवन परिसरातील घरी बोलावले. मात्र, ती तेथे पोहोचल्यावर आरोपी मुलांना घेऊन आला नव्हता. उलट त्याने तिला थंडपेय दिले. ते पिल्यानंतर तिचे डोके जड झाले व तिला चक्कर येऊ लागली. याच अवस्थेचा फायदा घेत आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध बलात्कार, नशिले पदार्थ देऊन गुन्हा करणे, तसेच इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.