
नागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरासमोरील अंगणात साफसफाई करणाऱ्या महिलेवर शेजाऱ्याने लोखंडी करवतीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना सोमवारी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास सदर परिसरातील जैन मंदिर बिल्डिंगजवळ, शिवहरे किराणा दुकानाच्या बाजूला घडली. ४० वर्षीय वर्षा सुनील वाढवे या घरासमोरील अंगणात साफसफाई करत होत्या. त्यावेळी त्यांचा ५५ वर्षीय शेजारी राजेश पिल्ले याने कथितरित्या हातातील लोखंडी करवतीने त्यांच्यावर हल्ला केला. आरोपीने वर्षा यांच्या डोक्यावर तसेच दोन्ही हातांवर वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
घटनेनंतर महिलेच्या पतीसह परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत त्यांना आरोपीपासून वाचवले. त्यानंतर जखमी वर्षा यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मानसिक आजारी असल्याचे सांगितले जात असून त्याच्याविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे समोर आले आहे. सदर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Displaying Dr.Adv.sandeep ji new .jpeg.




