Published On : Tue, Sep 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

आयआयटीसारख्या संस्थांमध्ये जातीय भेदभावाला थारा का? साहिल वाकोडे प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

Advertisement

IIT student suicide: BSP leader demands CBI probe, Rs 5 crore aid for family

नागपूर : आयआयटी मुंबईतील बी.टेक. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल रविंद्र वाकोडे याच्या आत्महत्येच्या घटनेने उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी सुरक्षितता आणि जातीय भेदभावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. साहिलच्या कुटुंबीयांनी जातीय स्वरूपाच्या छळाचा आरोप केला असून, या प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, तसेच पीडित कुटुंबीयांना ५ कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बसपचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. अॅड. संदीप ताजने यांनी केली आहे.

“आयआयटीसारख्या देशातील प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवलेल्या बहुजन विद्यार्थ्याला जातीय पूर्वग्रह, अपमान किंवा मानसिक दबावाला सामोरे जावे लागत असेल, तर ही केवळ एका विद्यार्थ्याची शोकांतिका नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या सामाजिक संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह आहे,” असे ताजने यांनी म्हटले.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

साहिलच्या प्रकरणात परीक्षा प्रक्रियेशी संबंधित घटनांनंतर त्याचा मृत्यू झाला. संस्थेने सुरुवातीच्या निवेदनातील काही बाबींवर नंतर स्पष्टीकरण देत माफी मागितली असून, प्रकरण तपासाधीन असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनीही तपास क्राइम ब्रँचकडे सोपवला आहे. मात्र, तपासाची व्याप्ती आणि निष्पक्षता लक्षात घेता सीबीआयकडे तपास सोपवावा, अशी मागणी ताजने यांनी केली.

उच्च शिक्षण संस्थांमध्ये एससी-एसटी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची केंद्र सरकारकडील आकडेवारीही त्यांनी उपस्थित केली. जातीय भेदभावाचा आरोप खरा की खोटा, हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे; मात्र अशा आरोपांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांच्या मानसिक वेदनांना केवळ शैक्षणिक दबाव म्हणून पाहणे योग्य नाही, असे ताजने यांनी सांगितले.

Advertisement

प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेत एससी-एसटी विद्यार्थ्यांसाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा, स्वतंत्र सामाजिक लेखापरीक्षण आणि उत्तरदायी समुपदेशन व्यवस्था उभारावी, अशी मागणीही त्यांनी केली. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही ताजने यांनी केली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.