Published On : Fri, Sep 4th, 2020

रेल्वे रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू?

नागपूर– कोरोना बाधित असलेल्या महिलेचा रेल्वे रुग्णालयात मृत्यू झाला. असा दावा रेल्वे कर्मचाèयांनी केला आहे. रेल्वे प्रशासनाने मात्र कामगारांचे आरोप फेटाळत असला कुठला प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

रेल्वे रुग्णालयातील कोरोनाच्या उद्रेकानंतर रेल्वे कर्मचाèयांमध्ये भीतीचे वातारवण निर्माण झाले आहे. संभाव्य धोके लक्षात घेता रेल्वे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाचे लक्षण आढळल्यात प्राथमिक तपासणीसाठी रेल्वे रुग्णालयात बोलावले जाते. तिथून गरजेनुसार व उपलब्ध जागेनुसार रुग्णांना संबंधित ठिकाणी रेफर केले जाते.

रेल्वे कर्मचाèयांच्या दाव्यानुसार रेल्वे रुग्णालयाला सोमवारपासून आयसोलेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. रेल्वे कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील कुणाला कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसल्यात रेल्वे रुग्णालयात येण्यास सांगण्यात आले आहे. या केंद्रात बुधवारी दोन रुग्ण होते. त्यानंतर एक महिला या रुग्णालयात आली. तिची कोरोना तपासणी केल्यानंतर देखरेखीसाठी रेल्वे रुग्णालयात थांबवून घेण्यात आले. आज तिचा तपासणी अहवाल कोरोना बाधित आला. याबाबत कळताच तिची प्रकृती खालावली. अन्य रुग्णालयाच हलिवण्याची तयारी सुरू असतानाच तिचा मृत्यू झाल्याचा कामगारांचा दावा आहे.
मध्य रेल्वेचे सहायत वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव यांनी ही बाब फेटाळून लावली. रेल्वे रुग्णालय कोरोना रुग्णांवर उपचारासाठी अधिकृत नाही. कोरोना संशयित रुग्ण आल्यास कोरोनावर उपचाराची सोय असणाèया शासकीय किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी रेफर केले जाते. यामुळे कोरोना रुग्ण ठेवलेच जाऊ शकत नाही.

पाच परिचारीकांना पाठविले मनपा रुग्णालयात
रेल्वे रुग्णालयातच मन्युष्यबळ कमी असताना येथील पाच परिचारिकांना हिंगणा येथील कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. रोटेशन पद्धतीने त्यांची ड्युटी लावली जात असल्याचा दावाही कर्मचाèयांनी केला असून हा दावासुद्धा प्रशासनाने फेटाळून लावला आहे. मात्र, कामगारही आपल्या आरोपांवर ठाम असून या प्रकाराने रेल्वे कामगारांसाठी असणारी आरोग्य व्यवस्थाच नाहीशी झाली असून हा प्रकार कामगारांच्या दृष्टीने अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणने आहे.