Published On : Sat, Jun 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कामठीत शुक्रवारी बाजार परिसरात महिलेची निर्घृण हत्या; चाकूचे वार करून संपविले

Advertisement

कामठी : नागपूर जिल्यातील कामठी शहरातील शुक्रवारी बाजार परिसरात एका अज्ञात महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. दरोगा मशिदीजवळ रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कामठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

प्राथमिक तपासात अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने महिलेवर सपासप वार केल्याचे समोर आले आहे. मृत महिलेच्या छाती, पाठी आणि पायावर चाकूचे चार खोल वार आढळून आले असून, अतिरक्तस्रावामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मृत महिलेचे वय अंदाजे ४० वर्षे असून, अद्याप तिची ओळख पटलेली नाही. मात्र, तिच्या हातावर ‘SMP’ असे गोंदलेले (टॅटू) असल्याने तोच तपासातील महत्त्वाचा धागा ठरत आहे. या आधारे महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे. या फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Advertisement

या खळबळजनक हत्येप्रकरणी कामठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून, महिलेची ओळख आणि हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से हमला! #NagpurNews #Crime #CrimeNews #news

नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से...

हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV

हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV

नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda #NagpurCrime

नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda...

मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews

मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges