Published On : Fri, Mar 15th, 2024

भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढणार ? खासदार नवनीत राणा म्हणाल्या…

Advertisement

नागपूर :अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार,अशी चर्चा राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून सुरु आहे. नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर नवनीत राणा भाजप पक्षाकडून निवडणूक लढणार अशी चर्चा पुन्हा सुरु झाली. यावर स्वतःत खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या निवडणूक लढण्याबाबत जे काही निर्णय घ्यायचे असतील ते आमच्या पक्षाचे प्रमुख रवी राणा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. आज तरी मी स्वाभिमान पक्षासाठी काम करतेय. मी आमच्या पक्षाच्या नावानेच माझ्या मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. मी गेल्या पाच वर्षांपासून माझ्या मतदारसंघात काम करतेय. मुळात प्रचार सुरू करायला गेल्या पाच वर्षांमध्ये माझं काम कधी बंद पडलंच नाही.

अमरावतीला ज्या वेगाने विकास हवा होता, त्याच वेगाने आम्ही काम केले आहे.आम्ही ज्यांना आमचे नेते मानतो ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यावर त्यांचं मत देतील. तसेच निवडणूक कुठल्या पक्षाकडून लढवायची ते आमच्या पक्षाचे म्हणजेच युवा स्वाभिमानचे अध्यक्ष रवी राणा आणि आमच्या पक्षाची कार्यकारिणी ठरवेल, असेही नवनीत राणा म्हणाल्या.

Advertisement