Published On : Wed, Oct 16th, 2019

दिवाळी पुर्वी तरी महामार्गाचे पथदिवे सुरू होणार का ?

कन्हान : – गेल्या दोन वर्षापासून शहरातुन जाणारा महामार्ग अंधारात असून वाटसरूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिवाळी पुर्वी तरी शहरातील महामार्गाचे पथदिवे सुरू होणार का ? असा प्रश्न जनतेत विचारला जात आहे.

गत दोन वर्षांपासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ऑटोमो टिव्ह चौक नागपूर ते टेकाडी फाट्या समोरील फोरलेन बायपास महामार्ग पर्यंत सुमारे अठरा किलोमीटर लांबीची चौपदरी सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. जवळपास वीस टक्के या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता भिलगाव कामठी कन्हान कांद्री या गावातून जातो या रस्त्यांच्या बांधकामासाठी सदर गावा तील स्ट्रीटलाइट असलेले शेकडो खांबे काढून नेण्यात आली त्यामुळे दोन वर्षा पासून शहरातुन जाणाऱ्या मार्गावर अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे जनते ला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

या महामार्गावर मोकाट जनावरां चा धुमाकूळ असुन रात्रीला रस्त्यावर जनावरे बसून असतात समोरून येणा ऱ्या वाहनाच्या लाईटच्या प्रकाशामुळे समोरील काही दिसत नाही. त्यामुळे अनेक अपघात होऊन निर्दोष लोक बळी पडत आहेत.

या नवनिर्मित चौपदरी सिमेंट रस्त्याच्या दोन्ही बाजुला खांब उभारून त्यावर पथदिवे लावण्यात आले आहेत तसेच भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत आणि विद्युत दिवे प्रकाशमय करून चाचपणी चार महिन्यापूर्वी घेण्यात आली पण तेव्हा पासून महामार्गावरील पथदिवे सुरू करण्यात आले नाही. यास्तव दिवाळी पुर्वी तरी हे महामार्गावरील पथदिवे सुरू होणार का ? याची आतुरतेने वाट जनता पाहात आहे.