Published On : Wed, Oct 16th, 2019

कराओके गायन स्पर्धैत संदेश व आदित्य अव्वल

रामटेक :-अभिनव कलादर्श व सांस्कृतिक क्रीडा मंडळाद्वारे स्व.संदीप चिचखेडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कराओके गायन स्पर्धेत ७ते१७वयोगटात आदित्य बर्डव व १८ वर्ष वरील गटात संदेश मेश्राम यांनी अव्वलस्थान पटकाविले.

स्थानिक देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूण ४० स्पर्धकामधून परिक्षक संगीतकार मोरेश्वर निस्ताने व सुरभी ढोमणे यांनी विजेत्यांची निवड केली.आशिष हटवार व यश कोल्हे यांनी व्दितीय क्रमांक पटकाविला.रितेश कुमरे,श्रीनिधी हांडे,आस्था डोंगरे,गोजिरी शेंडे या स्पर्धकास प्रोत्साहन पुरस्कार देण्यांत आले. कराओके गायन स्पर्धेचे आयोजन अभिनव कलादर्शचे विनोद कळमकर, नरेश शेंडे,धीरज राउत तन्मय चिचखेडे सह प्रशांत जांभुळकर यांनी केले.

प्रमोद कळमकर यांचे नेपथ्य तर अशोक हरडे यांचे निवेदन कार्यक्रमास लाभले,

मनोहर राऊत,दिपक चिचखेडे,अविनाश श्रीखंडे, चित्तरंजन गाडवे, संजय मेश्राम माधव भावे प्रशांत जांभुळकर सह अमोल गाडवे,शुभम नागपुरे,दिनेश रहाटे,पियुष जांभुळकर यांनी सफलतेसाठी सहकार्य केले.