Published On : Sat, Sep 12th, 2020

वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चे खवले मांजर रेस्क्यू ऑपरेशन

Advertisement

खवले मांजर हा जगातील सगळ्यात जास्त शिकार आणि तस्करी होणारा, मार्जार कुळातील प्राणी – शेंडे

रामटेक – दिनांक 11/9/2020 रात्री 12 चा दरम्यान शुभम मोहोभिया यांनि वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चे सदस्य मंथन सारभाऊ यांना कॉल केला व रजत जयेंद्र बोरकर यांचा घरात एक प्राणी असल्याची माहिती दिली मंथन सारभाऊ यांनी त्वरित स्वथेचे अध्यक्ष राहुल कोठेकर यांना माहिती देत सोबत सचिव अजय मेहरकुडे यांना घेऊन संकेत स्तडावर पोहोचले व तिथे त्याना खवल्या मांजर (प्यांगोलीयन) असल्याच लक्षात आले खवल्या मांजर चा सुखरूप रेस्क्यू करून त्याला त्वरित रेंज ऑफिस रामटेक मध्ये ठेवण्यात आले व सकाडी रेंज फॉरेस्ट रामटेक खुमारी खंड क्र.258 पी.एफ येथे मानसींगदेव अभियारण्याजवड रामटेक चे आर.एफ.ओ शेंडे , आर. ओ अंगेंडे , गार्ड पंकज कारामोरे सह वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायजेशन चे सदस्य समक्ष सुखरूप सोडण्यात आले वन्यजीव अभ्यासक श्री पराग दांडगे व वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायजेश चे अध्यक्ष राहुल बबनराव कोठेकर यांचा माहिती नुसार खवले मांजर हा जगातील सगळ्यात जास्त शिकार आणि तस्करी होणारा,

मार्जार कुळातील प्राणी आहे, सर्वसामान्य लोकांना या प्राण्याबद्दल फार थोडी माहिती असते, विदर्भातही या प्राण्यांची अवैध शिकार तसेच तस्करी सुरू असून वन्यजीव विभागाने या प्राण्याच्या सनवर्धनासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्याची गरज आहे। मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, छत्तीगड हे खवल्या मांजर शिकारीचे प्रमुख केंद्र असून तस्करीचे धागेदोरे चीन पर्यंत आहेत. विविध प्रकारच्या अंधश्रद्धा या प्राण्याबद्दलच्या असून तस्करीचे प्रमुख कारण त्यांच्या खवलयांचा चायनीज औषधी मधला वापर आहे। आपल्या कडे त्याच मांस खाण्यासाठी पण शिकार केली जाते।

वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायजेश चे सदैव सेवार्थ समर्पित हे ब्रीद वाक्य व या वाक्यात खरच सदैव प्रेरणा मिडते असे संस्थेचा सदस्यांचे मानणे आहे.