Published On : Fri, Apr 24th, 2020

पोलिसांचा मुखबिर समजून कोव्हीड योद्धाच्या वडीलाला मारहाण करणाऱ्या सात आरोपीला अटक

Advertisement

कामठी :-कोरोना व्हायरस प्रादुर्भाव नोयंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन विविध उपाययोजना करून नागरिकांना घरीच राहा, सतर्क राहा असा संदेश देत आहेत यातच पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता नुकतेच जुनी कामठी पोलिसांकडून 10 कोविड योद्धे निवडण्यात आले यातील एक कोव्हीड योद्धचे वडील फिर्यादी मो सलीम खाल लाल खान वय 53 वर्षे रा पुराणा भोईपुरा कामठी हे आपला तीन चाकी ऑटो क्रमांक एम एच 49 ए आर 7946 ने पोलीस प्रशासनाकडून सांगितलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याचा संदेश साउंड सिस्टम ने फिरवीत असता भोईपुरा येथील आरोपी शेख शकिर शेख इस्राईल यानी संगनमताने बेकायदेशीर मंडळी जमवुन 500 रुपये मे पोलीस की मुखबिरी करता है असे संबोधून ऑटो चालकाच्या उजव्या हाताचा चावा घेऊन जबर मारहाण केल्याची घटना सायंकाळी साडे सहा दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी जखमी मो सलीम खाल लाल खान वय 53 वर्षे रा पुराणा भोईपुरा कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून सात आरोपी विरुद्ध भादवी कलम 323, 325, 504 ,143, 147 अंनव्ये गुन्हा नोंदवित अटक करण्यात आले.

अटक आरोपीमध्ये शेख शाकिर शेख इस्राईल वय 28 वर्षे, अमझद खान उर्फ गुड्डू युनूस खान वय 27 वर्षे, शाहरुख खान युनूस खान वय 22 वर्षे, शेख सारफराज शेख इस्माईल वय 18 वर्षे, शेख परवेज शेख रशीद वय 21 वर्षे , शेख इरफान शेख इस्रईल वय 26 वर्षे, शेख रमजान शेख इजराईल वय 18 वर्षे सर्व रा पुराणा भोईपुरा कामठी असे आहे.

Gold Rate
13 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,31,800 /-
Gold 22 KT ₹ 1,22,600 /-
Silver/Kg ₹ 1,88,800/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement