Published On : Sat, Aug 29th, 2020

गोधणी ते झिंगाबाई टाकळी रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंटीकरनाचे काम लवकरात पूर्ण करावे

pwd चे उप विभागीय अभियंता यांना त्यांच्या कार्यालयात देण्यात आले

नागपुर – पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्र प्रभाग ११ येथील गोधणी ते झिंगाबाई टाकळी रस्त्याचे सिमेंटीकरण व रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागानी खाजगी ठेकेदाराला दिले असे कळले. या रस्त्याचा बांधकामाचा कालावधी संपूनही रस्ता पूर्ण झालेला नाही. रोज या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे या विषयावर मा. उदय भोयर साहेब यांना निवेदन देण्यात आले.

पार्टी निवेदनात खालील जे मुद्दे होते. ज्यावर सर्व गोधणी व झिंगाबाई टाकळी परीसरातील जनतेला त्रास होत होता..ज्याचे समाधान उदय भोयर यांनी मुद्देसूद केले।


१) भोयर साहेबानी स्वतः ठेकेदाराला फोन लावून बॅरिकेट्स ची व्यवस्था लवकरात लवकर करा असे सांगितले.

२) सुरक्षेच्या दृष्टीने उपाय केलेले आहे.एक सुरक्षा रक्षक तिथे आहे जिथे जास्त वर्दळ आहे अश्या ठिकाणी तो काम करतो तसेच dividers च्या मधात मोठी गॅप बुधवार पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

३) विद्युत खांब underground किंवा रस्त्याच्या बाजूला करावे याकरिता आपल्याला मुख्य अभियंता, (MSEB), नागपूर यांच्या नावाने वेगळे निवेदन दयावे लागेल.

४) नागमोडी वळण याकरिता जो NMC चा रस्ता त्यात PWD काम करत आहे.. यांचे समाधान करण्याकरिता NMC अधिकारी वर्गांशी चर्चा केली परंतु ते सपोर्ट करत नाही.

५) जी चूक गोधणी रस्त्यात झाली ती झिंगाबाई टाकळी ते फरस या रस्त्याचे काम करतांनी होणार नाही यावर आम्ही विशेष काळजी घेऊन रस्ता 1 फूट खोदून तयार करणार आहे जेणे करून वाहतूक व लोकांना त्रास होणार नाही .

वरील सर्व विषयांवर सविस्तर बोलणे झाले असून त्याचे निदान त्वरित करण्यात येईल व काही अडचण आल्यास मला फोन करा असे आश्वासन देण्यात आले

निवेदन देते वेळी आम आदमी पार्टी, नागपूरचे जिल्ह्याचे संघटन मंत्री शंकर इंगोले, पश्चिम नागपूरचे संयोजकआकाश कावळे, संघटन मंत्री हरीश गुरबानी, प्रभाग प्रमुख जय चौहान ,सह-सचिव मीडीया विवेक चापले, प्रभाग प्रमुख आकाश काळे, वार्ड प्रमुख ललित कटारिया, अमीर अन्सारी इत्यादी उपस्थित होते.