आजकालच्या धावपळीच्या जीवनात, कधी काय होईल सांगता येत नाही. अचानक आजारपण आलं, तर हॉस्पिटलचा खर्च खूप मोठा असतो. अशा वेळी तुमच्याकडे पुरेसा पैसा नसेल तर? अशी परिस्थिती टाळण्यासाठी आरोग्य विमा खूप महत्त्वाचा ठरतो.
आरोग्य विमा म्हणजे आर्थिक सुरक्षेचं कवच. आजारी पडल्यावर किंवा अॅक्सिडेंट झाल्यावर, हॉस्पिटल आणि उपचारांसाठी लागणारा खर्च इन्शुरेंस कंपनी भरते.
जेव्हा तुम्ही हेल्थ इन्शुरेंस घेता, तेव्हा तुम्हाला दर महिन्याला किंवा वर्षाला एक ठराविक प्रीमियम भरावं लागतं. जेव्हां अचानक काहीतरी झालं, एखादा मोठा आजार, अॅक्सिडेंट, किंवा सर्जरि करावी लागली. अशा वेळी हॉस्पिटल मध्ये भरती होण्याचा खर्च हजारोंमधून लाखोंपर्यंत जाऊ शकतो. पण जर तुम्ही हेल्थ इन्शुरेंस घेतलं असेल, तर तुमच्या खिशातून एक रुपयाही जाणार नाही. इन्शुरेंस कंपनी थेट हॉस्पिटल ला पैसे भरते, त्यामुळे तुम्हाला बिल ची टेन्शन घ्यायची गरज नाही. चला, इन्शुरेंस बद्दल अधिक जाणून घेऊया!
हेल्थ इन्शुरेंसचे प्रकार
हेल्थ इन्शुरेंस हा एकच असतो, असं नाही. तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार वेगवेगळे प्रकारचे हेल्थ इन्शुरेंस उपलब्ध आहेत. चला, ते सोप्या भाषेत समजून घेऊया.
- इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स- हा इन्शुरेंस फक्त एका व्यक्तीसाठी असतो. जर तुम्ही एकटे असाल आणि फक्त तुमच्यासाठीच कवरेज हवं असेल, तर हा विमा तुमच्यासाठी योग्य आहे. यात तुमच्या हॉस्पिटलच्या खर्चाची, डॉक्टरच्या फीची आणि औषधांची कव्हरेज मिळते.
- फॅमिली फ्लोटर प्लॅन- हा इन्शुरेंस संपूर्ण कुटुंबासाठी असतो. एकाच पॉलिसीमध्ये तुम्ही, तुमचे पती किंवा पत्नी, मुलं आणि काहीवेळा आई-वडीलसुद्धा यात अॅड होऊ शकतात. याचा फायदा म्हणजे, सगळ्यांसाठी वेगळे विमा घेण्यापेक्षा हा एकच विमा स्वस्त पडतो.
- ग्रुप हेल्थ इन्शुरन्स- हा विमा सहसा कंपन्या किंवा संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घेतात. यात सगळ्या कर्मचाऱ्यांना एकाच पॉलिसी अंतर्गत कव्हरेज मिळते. हा विमा स्वस्त असतो आणि त्यात कुटुंबाचा समावेशही असू शकतो. पण लक्षात ठेवा, जॉब सोडल्यावर हा कवरेज राहणार नाही.
- सीनियर सिटिझन हेल्थ इन्शुरन्स– हे खास आपल्या घरातील मोठ्या लोकांसाठी, म्हणजे सीनियर सिटिझन साठी असतं. वयस्कर लोकांमध्ये सहसा आजारपणाची शक्यता जास्त असते, म्हणून या विम्यात वयोवर्धन आजारांची कव्हरेज असते.
- क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स – कॅन्सर, हार्ट अटॅक, किडनी फेल्युर सारख्या गंभीर आजारांसाठी हा इन्शुरेंस असतो. यामध्ये, डायग्नोसिस झाल्यावर एक लंप सम अमाऊंट (एक मोठी रक्कम) मिळते. हा इन्शुरेंस रेग्युलर हेल्थ इन्शुरेंसपेक्षा वेगळा असतो, कारण तो फक्त गंभीर आजारांवर लक्ष केंद्रित करतो.
- अॅक्सिडेंटल इन्शुरेंस- अचानक झालेल्या अॅक्सिडेंटमुळे होणाऱ्या इजा किंवा डिसेबिलिटीसाठी हा विमा असतो. यात डॉक्टरचे खर्च, हॉस्पिटल बिल, आणि काही वेळा अपंगत्वाची रक्कमही मिळते.
- टॉप-अप प्लान- जर तुमच्याकडे आधीच एक हेल्थ विमा इन्शुरेंस आहे, पण तुम्हाला अतिरिक्त कव्हरेज हवी असेल, तर तुम्ही त्यात एक्स्ट्रा कवरेज घेऊ शकता.
- मैटरनिटी इन्शुरन्स – प्रेगनेंसी आणि बाळंतपणाच्या खर्चासाठी हा विमा असतो. यात नॉर्मल डिलिव्हरी किंवा सी-सेक्शन, डॉक्टरचे फी, आणि बाळाच्या आरोग्याची कव्हरेज असते.
हेल्थ इन्श्योरेन्सचे मुख्य फायदे
हेल्थ इन्शुरेंस म्हणजे फक्त एक पॉलिसी नाही यात अनेक उपयोगी गोष्टी असतात, ज्या तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
- मेडिकल खर्च- प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन, डॉक्टरची फी, टेस्ट्स, ऑपरेशन, औषधे, डे-केअर, ऍम्ब्युलन्स अश्या अनेक खर्च हरलथ इन्शुरेंस कव्हर करतं. त्यामुळे मोठ्या खर्चाची चिंता कमी होते.
- कॅशलेस ट्रीटमेंट- जर तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असाल, तर तुमच्या बिलाचे पैसे थेट विमा कंपनी भरेल. आणि जर तुम्ही नॉन-नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असाल, तर तुम्ही खर्च केलेले पैसे परत मिळवू शकता. तुम्हाला हेल्थ चेकअप आणि इतर वेलनेस बेनिफिट्ससुद्धा मिळतात.
- टॅक्स बेनिफिट्स- तुम्ही भरलेल्या प्रीमियमवर तुम्हाला इन्कम टॅक्स अॅक्ट 80D अंतर्गत टॅक्समध्ये मिळते. म्हणजेच इन्शुरेंस सोबत बचत सुद्धा.
- नो-क्लेम बोनस- जर तुम्ही एका वर्षात इन्शुरेंस क्लेम केला नाही, तर काही कंपन्या सम इंश्युअर्ड वाढवतात किंवा प्रीमियम वर सूट देतात.
- गंभीर आजारांसाठी– काही आजार खूप गंभीर असतात आणि त्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट आणि जास्त केअर लागते. अशा वेळी हॉस्पिटलचा खर्च खूप वाढू शकतो. म्हणूनच इन्शुरेंस कंपनी खास क्रिटिकल इलनेस प्लान देते.
हेल्थ इन्शुरेंस का आवश्यक आहे?
आजकाल हॉस्पिटलायझेशन, टेस्ट्स आणि औषधांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत हेल्थ इन्शुरेंस असणं म्हणजे मोठ्या आर्थिक संकटातून वाचण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.
- मेडिकल खर्च- आजकाल हे सर्वांनाच माहिती आहे की मेडिकल बिल म्हणजेच टेस्ट्स, औषधे आणि अगदी लहानशा सर्जरीचा खर्चही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी, दरवर्षी थोडासा प्रीमियम भरून तुम्ही तुमच्या सेविंग्स वाचवू शकता आणि कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेऊ शकता.
- बेस्ट हेल्थकेअर- हेल्थ इन्शुरेंस असल्यानं तुम्ही बेस्ट हॉस्पिटल मधून ट्रीटमेंट घेऊ शकता. तुमच्याकडे डॉक्टर , हॉस्पिटल्स, आणि ट्रीटमेंट निवडण्याचे जास्त ऑप्शन असतात.
- मानसिक शांतता- आजारी पडल्यावर किंवा अॅक्सिडेंट झाल्यावर फाइनैन्शल टेन्शन वाढतं. आणि त्याचा परिणाम मेंटल हेल्थ वर सुद्धा होतो. पण जर हेल्थ इन्शुरेंस असेल, तर तुम्ही फक्त रीकवरी वर लक्ष केंद्रित करता येतं, पैशांची चिंता राहत नाही.
- प्रिवेंटिव केअर- अनेक हेल्थ इन्शुरेंस प्लॅन्स मध्ये फ्री अॅन्युअल हेल्थ चेक अप्स दिले जातात. यामुळे डायबिटीज़, हॉर्ट प्रॉब्लेम्स, कॅन्सर यासारखे आजार लवकर पकडता येतात आणि मोठ्या त्रासापासून वाचता येतं.
- ग्लोबल कवरेज- काही हेल्थ इन्शुरेंस प्लॅन्स मध्ये इंटरनॅशनल कवरेज असते, म्हणजेच तुम्ही विदेशात गेल्यावरही ट्रीटमेंट घेऊ शकता.
- लाइफटाइम बेनेफिट- बहुतेक पॉलिसी मध्ये आता लाइफटाइम रिन्यूएबिलिटी असते. म्हणजे तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर पॉलिसी चालू ठेवू शकता.
- अॅम्ब्युलेन्स चार्ज- एमर्जन्सि अॅम्ब्युलेन्स सर्विस चा खर्चपण इन्शुरेंस कंपनी भरते. अचानक आपत्तीच्या वेळी हे खूप उपयुक्त ठरते
योग्य हेल्थ इन्शुरेंस योजना कशी निवडायची?
योग्य हेल्थ इन्शुरेंस प्लान निवडणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यावर तुमची आणि कुटुंबाची आरोग्य सुरक्षा आणि फ़ाइनेंशियल स्टबिलिटी अवलंबून असते.
- गरजा समजून घ्या- हेल्थ इन्शुरेंस निवडताना तुमचं वय आणि मेडिकल हिस्टरी लक्षात घ्यायला हवा. मोठ्या कुटुंबासाठी family floater plan फायदेशीर ठरतो.
- सम इन्शुर्ड- तुमच्या गरजेनुसार कवरेज अमाऊंट निवडा. मोठ्या शहरांमध्ये हास्पिटलज़ैशन इक्स्पेन्स जास्त असतात, त्यामुळे जास्त सम इन्शुर्ड असणारा प्लॅन घ्या.
- नेटवर्क हॉस्पिटल्स- तुमच्या आवडत्या हॉस्पिटल्स या नेटवर्कमध्ये आहेत का ते तपासा.
- प्री आणि पोस्ट हास्पिटलज़ैशन खर्च- अॅडमिट होण्या पूर्वीचे आणि डिस्चार्जनंतरचे खर्चही कव्हर करणारा प्लॅन निवडा.
- क्रिटिकल इलनेस कवर- काही आजार जसे की कॅन्सर , हार्ट प्रॉब्लेम्स, किडनी फेल्यर यासाठी स्पेशल कवर असणारा प्लॅन निवडणं फायदेशीर ठरेल.
- क्लेम सेटलमेंट रेशियो– CSR जास्त असलेली कंपनी निवडल्यास, क्लेम प्रोसेस सोपी होईल.
- वेटिंग पीरियड- काही प्री-एग्ज़िस्टिंग डिज़ीज़ साठी 2-4 वर्षांचा वेटिंग पीरियड असतो. जर तुम्हाला आधीपासूनच काही आजार असतील, तर कमी वेटिंग पीरियड असलेला प्लॅन निवडा.
- प्रीमियम आणि बेनेफिट्स- केवळ कमी प्रीमियम बघून प्लॅन निवडू नका. त्यातील कवरेज, इक्स्क्लूश़न, आणि बेनेफिट्स समजून घ्या आणि नंतर निर्णय घ्या.
- लवकर सुरुवात करा- तुम्ही जितके लहान असाल, तितका premium कमी असतो.
- No Claim Bonus (NCB) पहा.
- रिन्यूएबिलिटी- तुम्ही पॉलिसी वय वाढल्यावर renew करू शकता की नाही ते तपासा.
आजच्या काळात हेल्थ इन्शुरेंस असणे ही गरज बनली आहे. मेडिकल खर्च सतत वाढत आहेत आणि आजार कधी येतील हे सांगता येत नाही. अशा वेळी योग्य इन्शुरेंस पॉलिसी असली तर तुम्ही आणि तुमचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकता. आजारी पडणं आपल्या हातात नसतं, पण त्याचा आर्थिक बोजा कमी करणं आपल्या हातात असतं! म्हणूनच, आजच योग्य हेल्थ इन्शुरेंस घ्या आणि मनःशांती मिळवा!