नागपूर: अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. यादम्यान अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. नागपूरसह विदर्भासाठीही सरकारने अर्थसंकल्पात तरतुदी केल्या आहेत. यासाठी भाजपचे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री फडणवीससह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आभार मानले. ”आम्हावरी खिळले डोळे, उद्याच्या पिढ्यांचे आज स्वप्न बघतो आम्ही, उद्याच्या दिसांचे”,अशी कविताही दटके यांनी सादर केली.
नवीन रोजगार संधी-
महाराष्ट्र सरकारने राज्यात ५ लाख नवीन रोजगार संधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील तरुणांना नवीन संधी उपलब्ध होतील आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण- नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खाजगी सहकार्याने अपग्रेड आणि आधुनिकीकरण केले जाईल. या निर्णयामुळे हवाई प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील आणि राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना मिळेल.
विदर्भाच्या विकासासाठी अर्बन हाट केंद्र –
विदर्भाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नागपुरात अर्बन हाट केंद्र स्थापन केली जातील. यामुळे हस्तकला विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा मिळतील आणि राज्यातील हस्तकला उद्योगाला चालना मिळेल.
नागपूर मेट्रोचा विस्तार- नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात 6 हजार 708 कोटी रुपये किंमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्याची घोषणा शासनाने केली आहे.
वैनगंगा-नल गंगा नदी जोडणी प्रकल्प- वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 88 हजार ५७4 कोटी रुपये असून प्रकल्पाचे लाभक्षेत्र 3 लाख 71 हजार 277 हेक्टर आहे. या प्रकल्पाचा लाभ नागपूरसह संपूर्ण विदर्भाला होणार आहे.
दरम्यान समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीचा हा अर्थ संकल्प असून महाराष्ट्राच्या विकासाला या अर्थसंकल्पामुळे गती मिळणार आहे.त्यामुळे या अर्थसंकल्पाकरिता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे अभिनंदन करतो,असे दटके म्हणाले.