Published On : Sat, Apr 11th, 2020

वाधवान प्रकरणी मुख्यमंत्री गप्प का ?

नेत्यांचे पाप अधिकाऱ्यांवर थोपने योग्य आहे काय? : आ.कृष्णा खोपडे

BJP MLA Krishna Khopde

नागपूर : एकीकडे राज्यात कोरोनाचे थैमान असताना वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वर जाण्याची परवानगी देणे. कोणत्याही दृष्टीने योग्य वाटत नाही. मात्र हे प्रकरण मोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. इतका मोठा निर्णय शासनाच्या मर्जीशिवाय कोणताही अधिकारी घेत नाही.

यामागे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची सहमती निश्चितच आहे. या गंभीर प्रकरणाचे बिंब उघडे पडताच गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविले खरे, मात्र नेत्यांचे पाप अधिकाऱ्यावर थोपविणे योग्य आहे काय? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.


या प्रकरणावर राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प असून गृहमंत्री अनिल देशमुख मात्र थातूर-मातुर उत्तर देऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार व मंत्रिमंडळावर नियंत्रण नसून सरकार कोरोनासारख्या संकटकाळी सुद्धा गंभीर नसल्याचे स्पष्ट दिसून येते. सरकारने जबाबदारी घ्यावी व गृहमंत्री यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी यावेळी केलेली आहे.