Published On : Thu, Jul 25th, 2019

कन्हान उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय आणण्यारा भगीरथ कोण होणार ?

Advertisement

कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात रूपांतर करा.

कन्हान : – नगर परिषदेला पाच वर्ष होत असुन देखील लोकसंख्येनुसार व राष्ट्रीय महामार्गावर असल्याने उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता असुन देखील प्राथमिक आरोग्य केंद्रातच परिसरातील गावक-यांना व कन्हान शहरवाशीयांना समाधान मानावे लागत असुन वेळेवर व योग्य उपचार न मिळाल्याने कित्येक रूग्णाना प्राण गमवावे लागले आहे. यास्तव कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपजिल्हा ग्रामिण रूग्णालयात रूपांतर करण्याची मागणी जोर धरत असुन कोण भगीरथ होणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे .

पारशिवनी तालुक्याची लोकसंख्या १ लाख ४७ हजारावर असुन तालुक्यात एकुण ५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यामध्ये साटक, नवेगाव खैरी, डोरली, दहेगाव जोशी व कन्हान शहराचा देखील समावेश करण्यात आला आहे. पण मात्र कन्हान ग्रामीणची लोकसंख्या २१ हजार जवळ आहे तसेच कन्हान नगर परिषद ची लोकसंख्या २७ हजाराच्यावर आहे. लोकसंख्येनुसार कन्हान नगर परिषदेला ग्रामीण रुग्णालय देणे वेळेची गरज आहे तसेच कन्हान शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या मार्गावर अपघाताची संख्या सुध्दा बर्‍याच मोठय़ा प्रमाणात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र रूग्णाच्या सेवेकरिता अपुरे पडत आहे. यामुळे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाची अंत्यत आवश्यकता आहे.

कन्हान शहर हे आजुबाजुला असलेले लहान मोठे खेडे बोरडा, बोरी, निमखेडा, तेलनखेडी, केरडी, डुमरी, बखारी, एंसबा, नांदगाव, वाघोली, वराडा, घाटरोहणा, गोंडेगाव, टेेकाडी, कांद्री, खदान, जुनीकामठी, गाडेघाट, पिपरी, सिहोरा, निलज, खंडाळा, सिंगारदिप, बोरी, गहुहिवरा, खेडी आदी गावाचे केंद्र स्थळ असुन गावातील नागरीकांना आरोग्य विषयी समस्या किवा अपघाता ला बडी पडल्यास जखमी अवस्थेत प्रथम कन्हान ला प्राथमिक उपचार करून कामठी किवा नागपुर ला उपचारार्थ रवाना करण्यात येते यावेळेत योग्य उपचार न मिळाल्यास बहुसंख्य लोकांना आपले प्राण गमवावे लागते तसेच कामठी, नागपुर ला नेताना कन्हान चे रेल्वे फाटक सतत बंद मिळाल्याने कितीतरी गंभीर जखमी रूग्णाना प्राण गमवावे लागले आहे. या समस्यांवर निराकरण करण्यासाठी स्थानिक पातळीवर व राजकीय स्तरावरील देखील चर्चा करण्यात आली मात्र समाधानकारक निराकरण झाले नाही.

कन्हानचे जिल्हा परिषद सदस्य अंबादास खंडारे यानी कन्हान शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रश्न सभागृहात रेटून धरला. अखेर त्यांच्या प्रर्यत्नाला यश मिळुन कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्र उदघाटन करून सुरू करण्यात आले. पण मात्र खंडारे याचा कार्यकाळ १९९३-९४ चा गेला असुन सध्या २०१९ – २० वर्ष सुरू आहे. या दरम्यान कन्हान शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढलेली असल्याने ग्राम पंचायतीचे नगरपरिषद मध्ये रूपांतर झाले. त्याच धर्तीवर आरोग्य सुविधांचा गांभीर्याने विचार करून कन्हान शहर व परिसरा तील गावाच्या व शहराच्या नागरिकांना आरोग्य संबंधित सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्याकरिता प्राथमिक आरोग्य केन्द्राचे रूपांतर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मध्यंतरी नगराध्यक्ष अॅड.आशा पनीकर यानी आपल्या कार्यकाळात ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न रेटून धरल्याचे बोले जात होते मात्र त्याचा अद्याप काही कन्हान वांशीयाना लाभ झाला नाही. आता मात्र शंकर चहांदे याच्या कडे कन्हान नगर परिषदेचे अध्यक्ष पदभार येऊन दोन वर्षे झाले आणि फक्त सहा महिन्यांचा काळ शिल्लक असल्याने ते उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात काय दखल घेतात याकडे लोकांचे लक्ष केंद्रित आहे. ग्रामीण रुग्णालयात बांधण्यासाठी शासन व प्रशासनाने लवकरात लवकर तडजोड करून रुग्णालयाचे बांधकाम करूण वैद्यकीय सेवाचा विचार करावा जेणे करून कन्हान परिसर गावातील व शहरातील लोकांना योग्य व वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल. यास्तव नगरपरिषद कन्हान ते दिल्ली पर्यंत भाजपाची सत्ता असताना कन्हान ला उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय आणणारा भगीरथ कोण समोर येणार याकडे परिसरातील गावकरी व शहरवासी यांचे लक्ष लागले आहे.