Published On : Sat, Jul 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

धर्मेंद्र प्रधानांना नेमकं कोण वाचवतंय? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून केंद्र सरकारवर घणाघात

Advertisement

नागपूर : सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत सरकारची भूमिका प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले, “भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दूरदूरपर्यंत संबंध उरलेला नाही. युवकांच्या भवितव्याशी ज्या पद्धतीने खेळले जात आहे, ते अत्यंत लज्जास्पद आहे.

सरकारला सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची खरंच काळजी असेल, तर त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढायला हवा होता.” नीट परीक्षेच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर निशाणा साधत, “सरकारला नीटची परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही. त्यामुळे प्रशासनावर सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही,” अशी टीका केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असे काय आहे की अजून किती बळी गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाणार? पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आता सोनम वांगचुक स्वतःचे प्राण पणाला लावत आहेत. विद्यार्थीदेखील उपोषणाला बसल्याची माहिती आहे. तरीही त्यांच्या चुका का लपवल्या जात आहेत?” वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत न्यायालयाने व्यक्त केलेल्या चिंतेचाही उल्लेख करत त्यांनी सरकारला चर्चा करण्याचे आवाहन केले.

“उपोषणासारखे प्रश्न संवादातूनच सोडवले जातात. सरकारकडे अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी वांगचुक यांच्याशी चर्चा करून हे उपोषण संपवावे,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारवर प्रशासनावरील नियंत्रण गमावल्याचा आरोप करत, या प्रश्नावर व्यापक जनआंदोलन उभे राहण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.