Published On : Sat, Jul 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सोनम वांगचुक यांच्या मागण्यांपेक्षा आंदोलन दडपण्यात सरकारला रस; संजय राऊतांचा नागपुरात आरोप

Advertisement

नागपूर : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने वांगचुक यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी त्यांचे आंदोलन दडपण्याचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला.

राऊत म्हणाले, सोनम वांगचुक यांनी नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 21 दिवस उपोषण केले. मात्र सरकारने त्यांच्या मागण्यांवर कोणतीही भूमिका घेतली नाही. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपोषण करणाऱ्या वांगचुक यांना मध्यरात्री पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, ही लोकशाहीला न शोभणारी बाब असल्याची टीका त्यांनी केली.

Gold Rate
Aug 13 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,600 /-
Silver/Kg ₹ 2,36,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राऊत यांनी असा आरोपही केला की, उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यातील राम मंदिर आंदोलनाकडून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच वांगचुक यांच्यावरील कारवाई करण्यात आली.

राम मंदिर आंदोलनाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, हा कोणत्याही पक्षाचा राजकीय कार्यक्रम नसून रामभक्तांसाठीचे आंदोलन आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री, काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व रामभक्तांना निमंत्रण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेबाबत विचारले असता, ही चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू असली तरी संबंधित पक्ष त्याचा इन्कार करत असल्याचे राऊत म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना राऊत यांनी त्यांच्या नेतृत्व क्षमतेचे कौतुक केले. तसेच समान नागरी कायद्याला समर्थन देताना त्यात काही बदल आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Advertisement
Chitaroli Nagpur : नागपुर के बप्पा आखिर बनते कहाँ हैं?

Chitaroli Nagpur : नागपुर के बप्पा आखिर बनते कहाँ हैं?

NEET विवाद पर युवाओं की राय, विशेषज्ञों से मंथन

NEET विवाद पर युवाओं की राय, विशेषज्ञों से मंथन

RTO में रिश्वत का खेल बेनकाब! #NagpurNews #NagpurRTO #RTO #RTOScam #RTOCorruption #ACBRaid #Crime

RTO में रिश्वत का खेल बेनकाब! #NagpurNews #NagpurRTO #RTO #RTOScam #RTOCorruption #ACBRaid...

चुनाव आयोग बीजेपी का एजेंट, राऊत का गंभीर आरोप #maharashtranews #delhi #newsupdate #maharashtra

चुनाव आयोग बीजेपी का एजेंट, राऊत का गंभीर आरोप #maharashtranews #delhi #newsupdate...

दो बाइक की भीषण टक्कर! WCL कर्मचारी की मौत #Nagpur #RoadAccident #BikeAccident #newsupdate #news

दो बाइक की भीषण टक्कर! WCL कर्मचारी की मौत #Nagpur #RoadAccident #BikeAccident...

लॉज की आड़ में कथित देह व्यापार का खेल! नाबालिग समेत तीन महिलाएं मिलीं, लॉज का संचालक और गिरफ्तार..

लॉज की आड़ में कथित देह व्यापार का खेल! नाबालिग समेत तीन...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges