Published On : Thu, Jun 17th, 2021

सन्मान करतांना ‍जिल्हाधिकारी मा.श्री.रविंद्र ठाकरे

भारतीय संविधान तयार होत असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान आणि डीबेटस हया मुळे इंग्रजी ग्रंथाचे मराठी अनुवाद प्राध्यापक श्री. देविदास घोडेस्वार हयांनी १० ग्रंथाची रचना करुन पब्लिश केले.

त्या प्रित्यर्थ नागपूर जिल्हाधिकारी मा.रविंद्र ठाकरे साहेबांनी प्राध्यापक श्री. देविदास घोडेस्वार हयांचा सन्मान केला. त्या प्रसंगी नागपूर म.न.पा.बसपा पक्षनेते मा.जितेंद्र घोडेस्वार, माजी जिल्हा अध्यक्ष बसपा श्री.विलास सोमकुंवर उपस्थित होते.

त्याप्रसंगी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे साहेबांनी शुभेच्छा प्रदान करुन १० खंडाचा पुर्ण सेट विकत घेतला. तसेच वाचक वर्गाकरीता या पुस्तकांचे सेट उपलब्ध असल्याचे प्राध्यापक श्री. देविदास घोडेस्वार यांनी सांगितले.

Advertisement