Published On : Thu, Jun 17th, 2021

चार्ली’आता नविन गणवेशात दिसणार

कामठी :- पोलिसांची तात्काळ मदत व्हावी यासाठी पोलीस विभागाचे 100 क्रमांकाचे टोल फ्री नंबर वर फोन केल्यास कंट्रोल रूम मधून थेट संदेश हा संबंधित पोलिस स्टेशन च्या बिट मार्शल, चार्ली ला दिले असता संबंधित चार्ली हा आपल्या शासकीय दुचाकी वाहनाद्वारे तात्काळ घटनास्थळी पोहोचतात तेव्हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी व नागरिकांची सुरक्षा अधिक सक्षम व्हावे यासाठी पालकमंत्री ना नितीन राऊत यांनी शहर पोलिसांना जिल्हा नियोजन अंतर्गत 14 जीप व 72 मोटर सायकली उपल्बध करून दिल्या यानुसार नवीन कामठी स्टेशन ला चार्ली साठी नवीन दुचाकी भेट दिल्या आहेत तसेच या चार्ली ची एक वेगळी ओळख व्हावी यासाठी यांच्या खाकी गणवेशात बदल आणून नवीन गणवेश (डांगरी)दिले .यानुसार कामठी पोलीस स्टेशन चे चार्ली आता डांगरी गणवेशात नव्या स्वरूपात दिसणार आहेत.

डांगरी गणवेशात असलेले हे चार्ली पोलिसांना मिळालेल्या नवीन वाहनांमुळे पोलीस अत्यंत कमी वेळेत घटनास्थळावर पोहोचतील तसेच शहरातील अतिसंवेदनशील भागात दिवसरात्र पोलीस गस्त घालतील .या नवीन चार्ली योजनेत कामठी पोलीस स्टेशन चे चार्ली रविकांत बंड, इम्रान शेख, आदी चार्ली कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.