Published On : Tue, Jun 8th, 2021

अजित पारसे यांचा नागपूर पोलिसकडून गौरव.

सोशल मिडियातून कोरोनाबाबत जनजागृतीची घेतली दखल.

सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांना सन्मानपत्र देताना पोलिस उपायुक्त विनिता एस.

नागपूर: गेल्या वर्षभरापासून कोरोनापासून बचाव, अफवा, अनधिकृत वृत्त याबाबत जनजागृती करीत लोकांना सोशल मिडियाच्या माध्यमातून सावध करण्यासाठी सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांचा नागपूर पोलिसकडून गौरव करण्यात आला. पोलिस उपायुक्त विनिता एस. यांनी त्यांना नुकताच सन्मानपत्र दिले.

Advertisement

कोरोनाचे आगमन झाल्यापासून अजित पारसे सोशल मिडियाच्या माध्यमातून विविध पोस्टद्वारे जनजागृती करीत आहेत. गेल्या मार्च, एप्रिलमध्ये औषधांचा तुटवडा, इंजेक्शनचा तुटवडा बघता काही असामाजिक तत्वाकडून लोकांना ऑनलाईन लुटण्याचे प्रकार होत असून लोकांना त्यांना पोस्टद्वारे सावध केले. एवढेच शहरात असलेले बेड याबाबत अधिकृत माहितीही त्यांनी लोकांपर्यंत पोहोचविली. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेकजण घरीच होते. त्यामुळे मोठा वर्ग सोशल मिडियातूनच एकमेकांच्या संपर्कात होता.

ही बाब हेरून पारसे यांनी जनजागृतीवर भर दिला. त्यांच्या या कार्याची नागपूर पोलिसांनीही दखल घेत त्यांना सन्मानपत्र दिले. नागरिकांच्या सेवेचे हे व्रत असेच सुरू ठेवावे, अशा शुभेच्छा पोलिस उपायुक्त विनिता एस. यांनी त्यांना दिल्या. उपायुक्त विनिता एस. यांनी त्यांच्या कक्षात पारसे यांचा सन्मान केला. कुठलाही सन्मान ही आनंदाची बाब असली तरी त्यामुळे जबाबदारीतही वाढ होते. त्यामुळे समाजात कोरोना किंवा ऑनलाईन होणारी फसवणूक, अनधिकृत माहिती यापासून जनजागृती करताना कुठेही चूक होऊ नये, याचीही काळजी घेतली जाणार असल्याचे सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement