Published On : Sat, Oct 17th, 2020

यशोमती ठाकूर राजीनामा कधी देणार ?: आ.कृष्णा खोपडे

Advertisement

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री राज्याची महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या चिंध्या उडवीत एक कर्तव्यात हजार असलेल्या पोलीस कर्मचा-यांच्या कानशिलात लावले. न्यायालयाने पोलीस अधिका-यांची बाजू घेत अशा बेजबाबदार मंत्र्याला शिक्षा ठोठावली व कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचा-याला न्याय मिळवून दिला. ठाकूर यांनी या प्रकरणात दिलगिरी व्यक्त न करता, पोलीस कर्मचा-यांची माफी न मागता उलट शिरजोरपणे वक्तव्य केले. अशी बेजबाबदारपणे वागणूक करणा-या यशोमती ठाकूर या राजीनामा देण्यास विलंब कां करीत आहे? सोनिया, उद्धव की पवार कोण्याच्या आदेशाची वाट पाहत आहे? हे त्यांनी जनतेला सांगावं, नाहीतर मुकाट्याने राजीनामा देऊन नैतिकता पाळावी, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.

मंत्री होताना घेतलेल्या शपथेची अवमानना, संविधानाचा केला अपमान
मंत्री म्हणून शपथ घेताना कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेतली जाते, मात्र यांनी कायद्याची पायमल्ली केली असून शपथेची अवमानना केली आहे. एक अर्थाने संविधानाचा अपमान मंत्री ठाकूर यांनी केलेला आहे. त्यामुळे यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.

Gold Rate
05 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,35,600/-
Gold 22 KT ₹ 1,26,100 /-
Silver/Kg ₹ 2,36,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री व गृहमंत्री गप्प कां?
महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा धिडोरा पिटणारे मुख्यमंत्री व गृहमंत्री आपल्या सरकारमधील मंत्र्याच्या बेजबाबदार वागणुकीवर गप्प कां बसले आहे. ते राजीनामा देत नसतील तर तुम्ही त्यांना मंत्रीमंडळातून काढा. कायद्याची पायमल्ली करणा-या मंत्र्याला सोबत घेऊन आपण जनतेला काय संदेश देणार आहात. गृहमंत्री आपल्या कर्मचा-याचे बाजूने आहे की आपले साकारी मंत्र्याच्या? त्यांनी स्पष्ट करावे.

इतर राज्यात जाऊन कायद्याची शिकवण देणा-या कॉंग्रेसचा खरा चेहरा उघडकीस आलेला आहे. आपल्या मंत्र्यावर आता का कारवाई करणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले असून राजीनामा घेतला नाही तर कायदा व सुव्यवस्थेवर भाष्य करण्याचा अधिकार देखील मुख्यमंत्री व गृहमंत्री गमावून बसेल, हे देखील लक्षात ठेवले पाहीजे.

आमदार कृष्णा खोपडे यांनी अशी खडाडून टीका या प्रकरणी केली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement