Published On : Thu, Aug 20th, 2020

अवैध दारू विक्री बंद कधी होणार..?

Advertisement

– गावात अवैध दारू विक्री कोणाच्या आशीर्वादात सुरू आहे..?

धापेवाडा:-कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा गाव परिसरात महिलाच्या सहकार्याने अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे मात्र 5 महिन्या पासून अवैध दारु विक्री पुन्हा जोरात सुरू झाली आहे. यामुळे गावातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्याप्त असून अवैध दारु विक्री पूर्णपणे बंद करण्यात यावी या मागणीला घेऊन सर्व महिलांनी एल्गार पुकारला आहे.

गावात मागील 10 ते 15 वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू होती. ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलिस प्रशासनाला इत्यादींनी स्थानिक गावातील महिलांच्या निवेदनाला काणाडोळा केला असून दारू विक्री बंद केली नाही परंतु अवैध दारू विक्रेते ग्रामस्थांच्या निर्णयावर अंमल करून फक्त काही काळासाठी दारू विक्रीवर प्रतिबंध ठेवत असत. यानंतर पुन्हा ही अवैध दारू विक्री सातत्याने सुरू करतात. त्यामुळे जेव्हा पैसे नसतात तेव्हा व्यसनी व्यक्ती आपल्या मुलाबाळांना, पत्नीला व आई-वडिलांना मारहाण करून घरातील धान्ये व भांडी विकून आपली व्यसनपूर्ती करतात. आजची नवीन पिढी अवघ्या १२ ते २० वर्षे वयोगटातील युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत.

ही अवैध दारू विक्री किती वेळा बंद व किती वेळा सुरू होत राहील, असा सवाल स्थानिक महिलांनी उपस्थित केला आहे. या विक्रेत्यांविरूद्ध काही सुज्ज्ञ नागरिकांमध्येही रोष आहे. येथील अवैध दारू विक्री १०० टक्के बंद व्हावी यासाठी १९ आॅगस्ट २०२० रोजी धापेवाडा येथे अवैध दारू विक्री विरोधात प्रसार माध्यमाची पत्रकार ची मदत घेण्यात आली.

पोलिसांनी दारू विक्रेत्याची साठगाठ असून दारू विक्रेते त्यांना लाच देतात व पोलिसांच्या आशीर्वादाने हा अवैध दारू विक्री धंदा राजरोसपणे सुरू आहे… गावातील महिलानी राज्याचे कँबिनेट मंत्री क्षेत्राचे आमदार सुनील बाबू केदार यांच्या कडे सुद्धा या बाबतीत चर्चा केली असून दारू विक्रेत्यांची स्थिती जैसे थे अशी च आहे गावातील दारू बंद करण्यात आली नाही तर महिलांनी चक्का जाम करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला..