Published On : Tue, May 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पश्चिम बंगालच्या जनतेने गुंडाराज नाकारून विकासाला साथ दिली; ॲड. धर्मपाल मेश्राम यांची प्रतिक्रिया

Advertisement

नागपूर – पश्चिम बंगालमध्ये दीदींचा गुंडाराज संपुष्टात आणत भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवा इतिहास घडवला आहे. यासोबतच आसाम आणि पुद्दुचेरी या दोन्ही राज्यांमध्ये देखील एकहाती यश खेचून आणले आहे. हे यश म्हणजे जनतेने भारतीय जनता पक्षावर दाखविलेला विश्वास आहे.

तृणमूल कॉंग्रेसने मागील १५ वर्षांच्या सत्ताकाळात चालविलेले तु्ष्टिकरण, परिवारवाद व दहशतगर्दीच्या राजकारणाला सपशेल नाकारत देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, राष्ट्रवाद, सुशासन व पारदर्शी कार्याचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे माजी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली आहे.

देशाला दूरदर्शी नेतृत्व लाभलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आणि गृहमंत्री अमित शाह यांचे सुक्ष्म नियोजन आणि संघटनबांधणी, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोबतच हजारो कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित आहे.

पश्चिम बंगालमध्ये सत्तेच्या नावावर फोफावणारा गुंडाराज आणि विकासाचे केवळ स्वप्न दाखवून होत असलेली फसवणूक यावर हा निकाल चोख उत्तर आहे. एकीकडे देश विकासाच्या वाटेवर स्वार असताना पश्चिम बंगालची जनता मात्र तुष्टीकरणाला बळी पडत होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या निकालातून पश्चिम बंगालच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी केली आहे, अशीही प्रतिक्रिया ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.