Published On : Tue, May 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

बुटीबोरीत पीएम आवास योजनेतील फ्लॅटधारकांचा संताप; सिरसीकर डेव्हलपर्सविरोधात जोरदार आंदोलन!

Advertisement

नागपूर : बुटीबोरी परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत फ्लॅट बुक केलेल्या नागरिकांचा संयम अखेर सुटला असून सिरसीकर डेव्हलपर्सकडून अद्याप फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने लाभार्थ्यांनी प्रकल्पस्थळी तीव्र आंदोलन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत अनेक कुटुंबांनी आपली आयुष्यभराची जमापुंजी गुंतवून घराचे स्वप्न पाहिले होते. मात्र दीर्घ काळ लोटूनही फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत गेली. अखेर आज संतप्त लाभार्थ्यांनी एकत्र येत प्रकल्पस्थळी धडक देत जोरदार घोषणाबाजी केली आणि तातडीने फ्लॅट हस्तांतरित करण्याची मागणी केली.

आंदोलनानंतर सर्व पीडित नागरिक बुटीबोरी पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथे त्यांनी सिरसीकर डेव्हलपर्सविरोधात लेखी तक्रार नोंदवली. अनेक लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की, वारंवार आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

बुटीबोरी पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांनी तक्रार स्वीकारून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की लवकरच तोडगा न निघाल्यास मोठ्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल.

Advertisement

या घटनेमुळे बुटीबोरी परिसरात बांधकाम प्रकल्प आणि घर खरेदीदारांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.