
कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रभावी कामगिरी करत सत्तेच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. सुरुवातीच्या कलांपासूनच पक्ष आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत गेले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने महत्त्वाची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे सोपवली असून त्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री निवडीसाठी तेच अंतिम निर्णय घेणार आहेत.
तसेच, मोहन चरण माझी यांची उपनिरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. लवकरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होण्याची शक्यता असून ९ तारखेला शपथविधी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.








