Published On : Wed, Jul 17th, 2019

कु. माहेश्वरी नाटकर 82% गुण प्राप्त करून बी. ए. अंतिम वर्षाला प्रथम

विद्यासागर कला महाविद्यालयाचे सुयश

रामटेक: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा बी. ए. अंतिम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून रामटेकच्या विद्यासागर कला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. माहेश्वरी नाटकर हिने 82% गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला.तर विक्की विक्की बागडेने 80%गुण घेऊन द्वितीय क्रमांक आणि कु निकिता ठाकरे हिने 79%गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला.

विद्यापीठ निकालात महाविद्यालय सातत्याने अग्रेसर राहत असून या वर्षीच्या पदवी निकालात महाविद्यालयाचे 10 विद्यार्थी 70 टक्केच्या वर गुण घेऊन उत्तीर्ण झालेत तर 40 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

सर्व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे विद्यासागर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,खनिकर्म विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार आशिष जयस्वाल, सचिव श्रीमती अनिताजी जयस्वाल , प्राचार्य ,डॉ. पी , के.यु .पिल्लई ,सर्व प्राद्यापकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.