Published On : Wed, Jul 17th, 2019

श्री गणेश मंदिर व्दारे गुणवंत विद्यार्थ्यां चा भव्य सत्कार सोहळा संपन्न

कन्हान : – सिद्धविनायक गणेश मंदिर पांधन रोड कन्हान व्दारे परिसरातील दहावी व बारावीच्या १५० गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध २२ सामाजिक संस्था च्या वतीने पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात आला. रविवार (दि१४) जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता हार्दिक मंगल कार्यालय कन्हान येथे सिध्दीविनायक गणेश मंदिर, गणेश नगर कन्हान व्दारे कन्हान व्दारे आयोजित भव्य सत्कार सोहळा रामटेक श्रेत्राचे आमदार डी एम रेड्डी यांच्या अध्यक्षेत खनिकर्म मंडळाचे आशिष जैस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी नगराध्यक्ष शंकर चहांदे , माजी नगराध्यक्षा अँड आशाताई पनीकर, जि प सदस्या कल्पनाताई चहांदे , नगरसेविका करूणाताई आष्टणकर, रफ्तार बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा मिमांशा दुबे, सखी मंच अध्यक्षा पोर्णिमा दुबे, श्री गणेश सेवा समिती अध्यक्ष डॉ घनश्याम मुंधडा, नगरसेवक राजेश यादव, वर्धराज पिल्ले, उपसरपंच भुषण इंगोले, विनोद किरपान, डँनियल शेंडे , विनय यादव, अनिल चौरसिया, देवराव माहोरे प्रामुख्याने उपस्थित होते. कन्हान परिसरातुन इयत्ता १२ वी च्या परिक्षेत प्रथम कु झोया जाकीर शेख ९२.४६%, व्दितीय कु शिवानी संजय गुप्ता ८९.०७%, तृतीय सुष्मिता ञानेश्वर कुथे ८७.६९% व इयत्ता १० वी मध्ये प्रथम कु निशा जायसवाल ९५.४०%, कु अंशा पशिने ९२.६०% , कु सिध्दी लोंखडे ९१ %, दिव्यांग मध्ये कर्णबधिर अदिती मोहन कुमार यादव ८४.६०% व अंध रितेश प्रसाद ७८% यांच्या विशेष पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यात इयत्ता १२ वी मध्ये ७०% आणि इयत्ता १० वी मध्ये ७५ % व च्या वर गुणवंत १५० विद्यार्थ्याचा सत्कार करून उच्च शिक्षण व नौकरी संबंधित विद्यार्थाना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक चंद्रकुमार चौकसे सर हयानी केले. सुत्रसंचालन गजराज देविया सर यांनी तर आभार प्रदर्शन विजय पारधी सर हयानी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सिध्दी विनायक गणेश मंदिर पांधन रोड कन्हान व श्री गणेश सेवा समितीचे जगमोहन कपुर, राजीव राठी, पी डी जैस्वाल, नथुजी चरडे, अमित थटेरे, विनय यादव, प्रकाश तिवारी, अमित मेंघरे सह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी सहकार्य केले.