Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Apr 17th, 2021

  सुप्रसिद्ध युवा शिवकथाकार डॉ श्री सुमंत टेकाडे यांचे करोना मुळे निधन.

  आजच्या व्यवस्थापन युगात तंतोतंत खरे उतरणारे शिवरायांचे आदर्श अंतिशय अभ्यासपूर्णरितीने मांडणारे, युवकांमधे लोकप्रिय वक्ते आणि लोभस व्यक्तीत्व लाभलेले डॉक्टर श्री सुमंत टेकाडे यांचे वयाचे अवघ्या 38व्या वर्षी आज पहाटे निधन झाले.

  बंगलोर मधून व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सुमंत विप्रोच्या human resource विभागात कार्यरत होते. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघा विषयीचे प्रेम स्वस्थ बसु देत न्हवते. नोकरी सोडून ते प्रचारक गेले व नंतर व्यवस्थापन विषयात आचार्य पदवी संपादंन करुन ते S P Jain महाविद्यालयात काही काळ विभागप्रमुख होते.

  तिही नौकरी सोडून त्यानी शिवराय व त्यांचे व्यवस्थापन कौशल्य व व्यवस्थापनाशी निगडीत ईतर विषय यावर भाषणे देऊन समाजप्रबोधन करणे हे व्रत अंगीकारले. त्यांचे राज्य आणि परराज्यातिल कार्यक्रम लक्ष वेधून घेत होते. त्यांचे आजोबा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाष्यकार मा गो वैद्य आणि शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे त्याना मोलाचे मार्गदरर्शन लाभले.

  लवकरच त्यानी लिहीलेल्या पुस्तकाचे व लेखसंग्रहा चे प्रकाशन करण्याचा त्यांचा मानस होता. त्यातच काळाने घाव घातला व एका समाजभीमूख व्यक्तीत्वचा अंत झाला ते नवयुग विद्यालयाचे माजी शिक्षक वा धरमपेठ शिक्षण संस्थेचे माजी पदाधिकारी श्री दत्ता टेकाडे यांचे सुपुत्र होते. त्यांचे मागे पत्नी माधवी, दोन मुले आणि आई व बराच मोठा आप्तपरीवार आहे.

  त्यांच्या आत्म्यास सद्गति मिळो आणि कुटुंबीयांना दुख सहन करण्याची ताकद हिच ईश्वरचरणी प्रार्थना


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145