Published On : Wed, Aug 2nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाईंची गळफास लावून आत्महत्या

Advertisement

मुंबई: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या कर्जत येथेली एन. डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टीतून शोककळा पसरली आहे.

नितीन देसाई यांनी आतापर्यंत बऱ्याच चित्रपटासाठी कला दिग्दर्शन केले आहे. किक , जोधा अकबर, जोधा अकबर (टीव्ही मालिका), राजा शिवछत्रपती (मराठी, टीव्ही मालिका), बालगंधर्व (मराठी, चित्रपट), स्लमडॉग मिलेनियर, बाजीराव मस्तानी, प्रेम रतन धन पायो सारख्या मोठया चित्रपटांचा समावेश आहे.

Gold Rate
Feb 13 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,800 /-
Gold 22 KT ₹ 1,44,000 /-
Silver/Kg ₹ 2,48,800 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान देसाई यांच्यावर 249 कोटींचे कर्ज होते त्यांच्यावर गेल्या 15 जुलै रोजी जप्तीची नोटीस बजावली होती. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement