Published On : Thu, Jan 10th, 2019

जनसंघर्ष यात्रेचे रामटेक येथे जल्लोषात स्वागत

Advertisement

रामटेक: महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने रामटेक येथील सुपर मार्केटमध्ये जनसंपर्क यात्रा भव्य रुपात पार पडली. यात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले युती शासनाने गेल्या चार वर्षांपासून केलेल्या अनेक आश्वासनाच्या पूर्तता करताना सामान्य माणसाला मात्र अनेक निर्णयांनि डबघाईला यावे लागले.

सातत्याने होणारी वस्तूंची भाववाढ,सतत होणारी पेट्रोल व डिझेलची भाववाढ यामुळे सामान्य माणसे व जनतेत रोष निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाववाढ मिळण्याएवजी त्यालाही संकटांचा सामना करावा लागत आहे आणि त्यातूनच निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी व शासनाच्या लक्षात सध्याच्या परिस्थितीत जगणाऱ्या माणसाचे हलाखीचे जगण्यास सध्याच्या शासनाची विविध धोरणे जवाबदार असून जनसंघर्ष यात्रेतून आवाज उठविण्यात आला. या सभेस माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिकम्हणाले की,” गेल्या चार वर्षांपासून सामान्य माणसाचे प्रश्न अजूनही कायम आहेत.

केंद्र व राज्य सरकारने अनेक आश्वासने दिली पण त्याची पूर्तता मात्र झाली नसल्याने जनता त्रस्त आहे.आणि हीच जनता यावेळी या शासनाला धडा शिकवेल.जनतेची दिशाभूल करून या मंडळींनी सत्ता प्राप्त केली मात्र सत्तेतून ते सामान्य माणसाचे कल्याण करू शकले नाही.”

माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,माणिकराव ठाकरे ,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार मुजफ्फर भाई हुसेन,आमदार नसीम खान,आमदार सुनील केदार,माजी मंत्री व नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, कामठी नगर परिषदेचे अध्यक्ष शाजा शेख पठाण, चांद्रपाल चौकसे ,हुकूमचंद आमधरे,डॉ अमोल देशमुख,नानाभाऊ गावंडे, श्याम उमाळकर ,जी. प .सदस्या शांताताई कुमरे,तक्षशिला वागधरे , कीर्ती ताई आहाके यांची उपस्थिती होती.शोभा राऊत,शुभांगी रामेलवार , सीमाताई भुरे,अवंतिका लेकुरवाळे,नगरधनचे सरपंच प्रशांत कामडी ,माजी नगराध्यक्ष अशोक बर्वे,नगरसेवक दामोदर धोपटे,उदयसिंग यादव,नकुल बरबटे,शंकर होलगिरे,मोहन यादव, सचिन किरपान,डॉ रामसिंग सहारे यांनी यशस्वी त्यासाठी प्रयत्न केले.