Published On : Fri, Jun 11th, 2021

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 11 ते 14 जून दरम्यान नागपूर दौऱ्यावर आहेत. आज दुपारी 12 वाजता नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले.

आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र चिरंजीव प्रसाद, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस अधीक्षक नागपूर गामीण राकेश ओला, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर आदी उपस्थित होते.

Gold Rate
26 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,400 /-
Gold 22 KT ₹ 1,06,400 /-
Silver/Kg ₹ 1,38,100/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या तीन दिवसांच्या या दौऱ्यामध्ये विविध शिष्टमंडळाच्या भेटीगाठी घेणार असून विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजता ब्लाईंड रिलिफ असोशिएशन कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. तर रविवारी सकाळी दहा वाजता दैनिक भास्कर तर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. रविवारी दुपारी सव्वा अकरा वाजता अंबाझरी रोड वरील ब्लाईंड रिलिफ असोशिएशन कार्यक्रमात ते पुन्हा सहभागी होणार आहेत. 14 जूनला ते परत मुंबई येथे रवाना होतील.

Advertisement
Advertisement