कामठी :-नागपूर महानगरपालिका गटनेते पदावर जितेंद्र घोडेस्वार यांची निवड झाल्याबद्दल कामठी विधानसभेच्या वतीने जितेंद्र घोडेस्वार यांचे महानगरपालिका येथील त्यांच्या दालनामध्ये सत्कार करण्यात आला. बसपा वरिष्ठ नेते किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांच्या शुभहस्ते जितेंद्र घोडेस्वार यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रसिद्धी पत्रकात किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब म्हणाले जितेंद्र घोडेस्वार हे प्रामाणिक व अनुभवी नेते आहेत राज्याचे अध्यक्ष एड .संदीप ताजणे यांनी नागपूर महानगरपालिकेसाठी बसपा गटनेते पदी जितेंद्र घोडेस्वार यांची नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी नागपूर जिल्हा महीला विंग च्या सचिव माया उके, वर्षा सहारे, कामठी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष इंजि.विक्रांत मेश्राम, कामठी विधानसभा क्षेत्र महिला विनच्या अध्यक्षा प्रतिभा नागदेवे, कामठी शहराचे अध्यक्ष विनय उके, कामठी शहर महिला विंग च्या अध्यक्षा सुनिता रंगारी, योगेश लांजेवार ,उमेश मेश्राम, उपस्थित होते.