| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jun 9th, 2021

  बीना गावांचे पुनर्वसन तात्काळ करा – सावरकर

  – आमदार यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

  कामठी :-कामठी तालुक्यातील बीना हे गाव कन्हान नदीच्या तीरावर वसलेले गाव असून मागील वर्षी आलेल्या पुरामुळे बीना गावाचे झालेले नुकसान पाहता शासन निर्णय १९ सप्टेंबर २०१९ अन्वये तात्काळ बिना गावाचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी आमदार टेकचंद सावरकर यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली.

  याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर यांनी सांगितले की तत्डकालीन फडणवीस सरकारमध्ये शासनाने निर्णय घेऊन बिना गावांचे पुनर्वसन करण्याकरिता WCL व्दारे ८४.७६ कोटी व महानिर्मिती व्दारे १२१.९६ कोटी असे एकूण २०६.७२ कोटी रुपयांना मंजूरी दिली होती

  परंतु महाविकास आघाडीने आज दोन वर्षं लोटूनही सदर निधी उपलब्ध न करून दिल्यामुळे बिना गावाचे पुनर्वसन होवू शकले नाही त्यामुळे महाविकास आघाडी सरकार हे जनतेच्या हिताची कामे करूच शकत नाही त्यांना फक्त वसुलीचे काम जगू शकतात असाही टोला याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर यांनी लगावला. निवेदन वेळी भिवा तांडेकर , सरपंच बंडू कापसे व गावातील नागरिक उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145