Published On : Wed, Aug 19th, 2020

जिम सुरू करण्याबाबत बुधवारी आंदोलन

महापौर संदीप जोशी होणार आंदोलनात सहभागी

नागपूर: महाराष्ट्रात सर्वत्र बंद असलेल्या जिम सुरू करण्याबाबत उद्या, बुधवारी (ता. १९) संपूर्ण नागपूर शहरात आंदोलन करण्यात येणार आहे. कोव्हिडचा सामना करताना रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिम सुरू करणे आवश्यक आहे ही भूमिका घेऊन महापौर संदीप जोशी हे स्वतःसुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत. बुधवारी (ता.१९) सकाळी ११ वाजता सोशल डिस्टंनसिंगचे पालन करून हे आंदोलन करण्यात येणार आहे. संविधान चौकात होणाऱ्या प्रातिनिधिक आंदोलनात महापौर संदीप जोशी सहभागी होणार आहेत. शहरात विविध ठिकाणी जिम पुढे होणाऱ्या या आंदोलनात सर्व आमदारही सहभागी होणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

Advertisement

अनलॉकमध्ये संपूर्ण देशात जिम सुरू करण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्रात जिम सुरू करण्याबाबत अजूनही कार्यवाही नाही. एकीकडे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम करा, असे आवाहन करण्यात येते. परंतू महाराष्ट्रातील जिम मात्र सुरू करण्यात आले नाही. दारूची दुकाने दोन महिन्याआधीच उघडण्यात आली. या दुकानांत सोशल डिस्टंनसिंगचे उल्लंघन होत आहे. दुसरीकडे शॉपिंग मॉलही सुरू करण्यात आले तिथेही सोशल डिस्टंनसिंगचे पालन होत नाही. ही सद्यस्थिती आहे. जिम सुरू करण्याबाबत नागपूर शहरातील जिम असोसिएशन, बॉडी बिल्डर असोसिएशन आणि जिममधील प्रशिक्षकांनी भेट घेऊन जिम सुरू करण्याबाबत विनंती केली. जिम सुरू करण्याच्या मागणीला समर्थन दर्शवित राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाला पाठींबा देण्याचेही जाहीर करण्यात आले. त्यानुसार बुधवारी (ता.१९) शहरातील २२२ जिम समोर जिममध्ये वर्कआउट करणारे पाच जण सोशल डिस्टंनसिंग ठेवून निदर्शन करणार आहेत. या सर्वांचे प्रातिनिधिक निदर्शन संविधान चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला पाच बॉडी बिल्डर करतील. जिममध्ये नियमीत जाणारी व्यक्ती म्हणून आपण स्वतःही आंदोलनात सहभागी होणार असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

Advertisement

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या आंदोलनाच्या ठिकाणी फक्त चार लोकांनीच उभे राहावे, सर्वांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे तसेच आंदोलन कुठल्याही चौकात न करता आपल्या जिम खालीच करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या ठिकाणी आंदोलनात होणार लोकप्रतिनिधी सहभागी
नागपूर शहरातील सर्व आमदार देखील शहरात ज्या ठिकाणी जिमचे आंदोलन असतील त्या ठिकाणी सहभागी होतील. प्रतापनगर चौकातील कोतवाल नगर येथील देशपांडे हेल्थ क्लब पुढे होणाऱ्या आंदोलनात खासदार डॉ. विकास महात्मे व आमदार अनिल सोले सहभागी होणार आहेत. मानेवाडा रोडवरील केतन हेल्थ क्लब आणि अयोध्या नगर येथील जॉगर्स फिटनेस क्लब समोर होणाऱ्या आंदोलनात आमदार मोहन मते सहभागी होतील. इंदोरा चौकातील पम्पिंग जिम समोर होणाऱ्या आंदोलनात माजी आमदार डॉ. मिलिंद माने, राम कुलर रोडवरील फिटनेस कोर्ड यार्ड समोर होणाऱ्या आंदोलनात मनपाचे क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अविज फिटनेस क्लब समोर होणाऱ्या आंदोलनात आमदार कृष्णा खोपडे, बडकस चौकातील वेस्टर्न जिम समोर होणाऱ्या आंदोलनात आमदार प्रवीण दटके, झेंडा चौक महाल येथील बजरंग फिटनेस समोर होणाऱ्या आंदोलनात आमदार गिरीश व्यास आणि अग्रसेन चौकातील हार्ड कोर फिटनेस क्लब समोर होणाऱ्या आंदोलनात आमदार विकास कुंभारे सहभागी होणार आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement