Published On : Sat, Jun 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सुप्रिया सुळेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे; कन्या रेवती आज नागपूरच्या सारंग लखानींसोबत घेणार सप्तपदी

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबात आज आनंदाचा आणि उत्साहाचा माहोल आहे. त्यांची कन्या रेवती सुळे आज नागपूरचे युवा उद्योजक सारंग लखानी यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असून दोन्ही प्रतिष्ठित कुटुंबांच्या या शुभमिलनाकडे राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुळे कुटुंबात लग्नसोहळ्याची जोरदार तयारी सुरू होती. विवाहपूर्व पूजा, पारंपरिक विधी आणि कौटुंबिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. या सोहळ्यांतील खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत असून रेवती आणि सारंग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Gold Rate
Aug 4 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,400 /-
Gold 22 KT ₹ 1,33,100 /-
Silver/Kg ₹ 2,21,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रेवती या सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या कन्या आहेत. तर सारंग लखानी हे नागपूरमधील प्रख्यात उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. ‘विश्वराज ग्रुप’चे कार्यकारी संचालक म्हणून सारंग उद्योगविश्वात सक्रिय असून त्यांनी आपल्या कार्यकुशलतेची स्वतंत्र छाप उमटवली आहे. व्यवसायासोबतच त्यांची क्रीडा क्षेत्रातही विशेष ओळख असून ते बॅडमिंटनचे उत्कृष्ट खेळाडू आहेत.

रेवती आणि सारंग यांच्या विवाहाची माहिती स्वतः सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून जाहीर केली होती. त्यानंतर लग्नाच्या तयारीला वेग आला. विवाहासाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून या सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती लाभण्याची शक्यता आहे.

Advertisement

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून ही सोयरीक जुळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. आज पार पडणारा हा विवाहसोहळा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन प्रतिष्ठित कुटुंबांच्या नात्याचा सोहळा ठरणार आहे.

सुळे आणि लखानी परिवारातील या आनंदोत्सवामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नवदाम्पत्याच्या नव्या आयुष्याच्या प्रवासासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Advertisement
स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime #policeaction

स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime...

छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do' बैनर #nagpurnews #politics

छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do'...

हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75 लाख तिरंगे

हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75...

40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी पूछताछ

40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी...

2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews  #UddhavThackeray #ShivSena #Political

2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews #UddhavThackeray #ShivSena #Political

बिना दस्तावेज मध्य प्रदेश की बस जब्त #MaharashtraNews #STBus #RTO #BusChecking #MPBus #TrafficNews

बिना दस्तावेज मध्य प्रदेश की बस जब्त #MaharashtraNews #STBus #RTO #BusChecking #MPBus...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges