नागपूर : शील कंपनीच्या इमारतील लागलेल्या आगीत १७ हजार ९९० जाळल्या असून ४ हजार ७४९ फाईल पाण्याने भिजल्या आहेत. या सर्व फाइलच्या प्रती येत्या ४ महिन्यात ही कंपनी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. म्हाडाच्या फाईल या कंपनीला संरक्षणार्थ दिलेल्या आहेत.
गृहनिर्माण मंत्री यांनी सांगितले की, म्हाडा व शील प्रोजेक्ट लिमिटेड यांच्याशी १२/१०/२०१२ रोजी झालेल्या करारानुसार म्हाडाच्या ५ लाख ३४ हजार ४७६ फाईल जनत करण्यासाठी देण्यात आल्या होत्या त्या पैकी एकूण १७ हजार ९९० जाळल्या असून ४ हजार ७४९ फाइल पाण्याने भिजल्या आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार अॅड आशिष शेलार यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तर मंत्र्यांनी उपरोक्त माहिती दिली.
या सर्व फाइलच्या प्रती येत्या ४ महिन्यात ही कंपनी उपलब्ध करून देणार आहे, याचा खर्च सदर कंपनी करणार असून, या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत असेही, मंत्र्यांनी स्पष्ट केले.