Published On : Mon, Jul 13th, 2020

जनतेच्या प्रश्नासाठी ओरडलो, काय चूक केली ?

नागपुर: रस्त्याचे एक काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे, एक महिला नगरसेविका अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करीत आहे, ते मानत नाहीत कधी बैठकीचे कारण सांगतात कधी कधी कोरोनाचे कारण सांगतात ज्यांना विनंतीची भाषा काळत नाही त्यांना त्यांच्याशी कुठल्या भाषेत बोलावे?

जनतेच्या करातून ज्यांचा पगार होतो ते जनतेचीच कामे करत नसतील तर त्या लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी काय करावे ?
माझे पूर्ण संभाषण तुम्ही तपासा, मी जोरात बोललो, मी खड्डयात जा अशा आशयाचे बोललो पण मी अश्लील बोललो नाही, आधी सगळ्या गोष्टी तपासा नंतर राजकारण करा असे आवाहन मी त्या अधिकाऱ्याच्या बोलवित्या धण्यास करीत आहे

माझ्या विरुद्ध कितीही आंदोलन करा , राजकारण करा जनतेच्या प्रश्नासाठी मी आवाज मोठा करणारच, गुन्हे कितीही लागू द्या।