Published On : Fri, Jul 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील वाठोड्यात 43.74 लाखांचा एमडी ड्रग्ज साठा जप्त; दोघांना अटक

Advertisement


नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट-3 पथकाने भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत 151 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडरसह तब्बल 43 लाख 74 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका सराईत आरोपीचा शोध सुरू आहे.

गुन्हे शाखेने वैष्णवी देवी नगर येथील विस्टा टॅटू स्टुडिओजवळ संशयितांची चौकशी करून एनडीपीएस कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करत पंचांसमक्ष झडती घेतली. त्यावेळी आरोपींकडून 151 ग्रॅम एमडी पावडर (किंमत 30.20 लाख रुपये), दोन मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, रोख 3,600 रुपये, होंडा सिटी कार आणि सुझुकी अॅक्सेस दुचाकी असा एकूण 43.74 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत मोहम्मद नियाज समसूल अन्सारी (34) आणि मोहम्मद असलम समसूल अन्सारी (34) या दोघांना अटक करण्यात आली. दोघांवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच विशाल उर्फ फल्ली गुप्ता हा या प्रकरणातील फरार आरोपी असून त्याचा शोध सुरू आहे.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणी भांडेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 200/2026 अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 22(क) आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भांडेवाडी पोलीस करत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.