Published On : Tue, Nov 26th, 2019

डिसेंबर 2020 पर्यंत संपूर्ण शहरात 24 तास पाणीपुरवठा

Advertisement

जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांचा विश्वास

नागपूर: शहरवासियांना 24 बाय 7 पाणी पुरवठा देण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असून डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण शहरात 24 तास पाणीपुरवठा सुरू होईल, असा विश्वास जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू)झलके यांनी केला. मंगळवारी (ता26) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात जलप्रदाय समितीची बैठक आयोजित बैठक आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी त्यांनी माहिती दिली.

Advertisement
Advertisement

बैठकीला समिती उपसभापती भगवान मेंढे, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, लकडगंज झोन सभापती राजकुमार साहू, आसीनगर झोन सभापती विरंका भिवगडे, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपरा, समिती सदस्य संजय महाजन, दीपक चौधरी, भुट्टो जुल्फेकार अहमद, वैशाली नारनवरे, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्लूचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय, संचालक एचआर आणि जनसंपर्क केएमपी सिंग, संचालक राजेश कारला प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना सभापती पिंटू झलके म्हणाले, 24 तास पाणीपुरवठा ही सेवा शहरात काही ठिकाणी सुरू करण्यात आली होती. काही ठिकाणी प्रतिसाद चांगला आला आहे. काही ठिकाणी काम करताना काही अडचणी असल्यामुळे या सेवेला उशीर होतो असल्याचेही त्यांनी सांगितले. येणाऱ्या सर्व अडचणी सोडविण्याचे काम प्रगतीप्रथावर सुरू असून पुढील वर्षभरात संपूर्ण शहराला 24 तास पाणी पुरवठा मिळेल, असे पिंटू झलके यांनी सांगितले.

प्रारंभी सभापती पिंटू झलके यांनी शहरातील पाणी पुरवठा संबंधीचा झोननिहाय आढावा घेतला. हुडकेश्वर नरसाळा भागात पाणी पुरवठा व नळ जोडणीबाबतही आढावा घेतला. या भागात आतापर्यंत ओसिडब्लू मार्फत किती कामे झाली. किती नळ जोडणी कनेक्शन करण्यात आले. याचा आढावा जलप्रदाय विभागामार्फत समितीपुढे सादर करण्याचे निर्देश सभापती पिंटू झलके यांनी दिले. नेहरूनगर झोनमध्ये जलप्रदाय विभागामार्फत कामासाठी खड्डे खोदण्यात आलेले आहे, अशी तक्रार समिता चकोले यांनी केली. त्यावर बोलताना पिंटू झलके यांनी विकास कामांसाठी केलेले खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश दिले. धंतोली झोनअंतर्गत काही वस्त्यांमध्ये मीटर चोरून जाण्याची तक्रार मोठ्या प्रमाणावर असल्याचे निर्दशनास आले असल्याची माहिती झोनच्या डेलीगेट्सने दिली. मिटर चोरून जाण्याच्या तक्रारी असेल तर सरळ पोलिसात एफआयआर नोंदवावी, असे निर्देश सभापती पिंटू झलके यांनी दिले. गांधीबाग व आसीनगर झोन मध्ये लो प्रेशर बाबत तक्रारी दिसून आल्या. यावर पिंटू झलके यांनी लो प्रेशर कश्यामुळे आहे यावर काय उपाययोजना करता येईल, याचा विचार करावा, असे सांगितले. गांधीबाग झोनमध्ये काही वस्तीत पाण्याचे देयके अजूनही थकित आहेत. वसुली करण्यासाठी गेलो असता, दम दिला जातो, अशी तक्रार आली, त्यावर बोलताना पिंटू झलके यांनी पाणी कनेक्शन तातडीने काढण्याचे निर्देश दिलेत.

अमृत योजनेसंदर्भातील आढावा सभापती पिंटू झलके यांनी घेतला. अमृत योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून ऑगस्ट 2020 पर्यत अमृत योजनेचे काम पूर्ण होईल, असे अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले. या योजनेमुळे डिसेंबर 2020 पर्यंत शहर टॅंकरमुक्त होईल, असा विश्वास सभापती श्री झलके यांनी व्यक्त केला. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील 50 विहिरींवर आरओ युनिट लावण्यात येणार असल्याची माहीती श्वेता बॅनर्जी यांनी दिली. दहा झोनमधील पाच विहीरी अशा 50 विहीरी निवडल्या आहे. यामध्ये आरओ युनिट लावून त्यावर वॉटर एटीएम बसविण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती श्वेता बॅनर्जी यांनी दिली.

जलप्रदाय विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या तीन गणेशोत्सव मंडळांना बक्षीसे वितरण करण्याचा कार्यक्रम महापौर कक्षात घ्यावा, अशी सूचना सभापती पिंटू झलके यांनी केली.

अल्ट्रासॉनिक फ्लो मिटर बसविणार

नवेगाव व पेंच जलाशयातून उचल केलेल्या पाण्याची कुठेही गळती होते. याचे निदान लवकर होत नाही. त्यामुळे कुठेही काही अडचणी लक्षात याव्या, याकरिता अल्ट्रासॉनिक फ्लो मिटर लावण्यात येणार असल्याची माहिती सभापती पिंटू झलके यांनी दिली. 30 किमीच्या पाईपलाईनवर 7 फ्लो मिटर लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement