Published On : Tue, Nov 26th, 2019

डॉ आंबेडकरांचा विजय असो !. च्या गर्जनेत संविधान दिन साजरा

कन्हान: – ओबीसी, एस.सी, एस.टी, एन.टी जनजागरण समिती महाराष्ट्र व रिपब्लिकन भीमशक्ती च्या सयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथुन संविधान रैली काढुन चौका चौकात संविधान प्रास्तविकाचे सामुहिक वाचन आणि डॉ आंबेडकर च्या गगनभेदी गर्जनेत संविधान दिवस साजरा करण्यात आला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे रिपब्लिकन भीमशक्तीचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर भिमटे व मान्यवरां च्या हस्ते डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून सामुहिक संविधान प्रास्तविकाचे वाचन करून “संविधान दिवस चिरायू हो !” डॉ आंबेडकरांचा विजय असो ! च्या गगनभेदी गर्जनेत डि जे सह रैली तारसा रोड चौक, नाका नं.७, गहुहिवरा चौक, शहिद चौक तारसा रोड, बुद्ध विहार गणेश नगर, गांधी चौक येथे सामुहिक संविधान प्रास्तविकाचे वाचन आणि डॉ आंबेडकर च्या गर्जनेत संविधान दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कन्हान चे ठाणेदार चंद्रकांत काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आत्राम, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील व पोलीस कर्मचारी यांना सविधान प्रस्ताविका भेट देण्यात आली. तद्नंतर सविधान रैलीचा समारोप डॉ आंबेडकर चौकात करण्यात आला. यावेळी सर्वश्री निखिल रामटेके, रोहित मानवटकर, कैलास बोरकर, रमेश गोडघाटे, रवी दुपारे, बाळू नागदेवे, उमेश बागडे, नरेश चिमणकर, रसिक गजभिये, अखिलेश मेश्राम, अभिजीत चांदुरकर, महेश धोंगडे, श्रीमती वैशाली देवीया, सुकेशनी बागडे, सारिका धारगावे, श्रीमती पवनीकर, कल्पना पाटील सह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.