Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jun 26th, 2020

  मनपा-NHAI यांचे उप्पलवाडी पूल येथे जुन्या व नवीन वाहिनीच्या आंतरजोडणीचे काम २७ जून रोजी

  आशी नगर व सतरंजीपुरा झोनचा पाणीपुरवठा शटडाऊन दरम्यान २४ तास राहणार बाधित

  कन्हान ९०० मिमी फीडर लाईनच्या शटडाऊनमुळे टँकरद्वारे पाणीपुरवठादेखील राहणार बंद

  नागपूर: उप्पलवाडी रेल्वेपूल जवळ पावसाळ्यात पाणी साठून गैरसोय होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (NHAI) याठिकाणी ९०० मिमीची नवीन जलवाहिनी टाकण्यात आलेली असून याच ठिकाणी नवीन वाहिनीला जुन्या जल वाहिनीशी जोडण्यासाठी आंतरजोडणीचे काम २७ जून रोजी हाती घेण्यात येत आहे. यासाठी मनपा आणि NHAI ह्यांनी कन्हान ९०० मिमी वाहिनीवर २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. हे काम २७ जून (शनिवार) सकाळी १० ते २८ जून (रविवार) सकाळी १० दरम्यान घेण्यात येईल.

  हे काम मनपा जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात येईल.

  नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी कि हे एक मोठे शटडाऊन असून या दरम्यान उत्तर नागपूरच्या विशेषकरून आशी नगर व सतरंजीपुरा झोनमधील जलकुम्भांना पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे यादरम्यान बाधित भागांना टँकरद्वारेदेखील पाणीपुरवठा होणार नाही.

  या कामांमुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे जलकुंभ:
  आशी नगर झोन: बिनाकी-१, बिनाकी-२, बिनाकी एग्झीस्टिंग, बेझनबाग, इंदोर-१, २, उप्पलवाडी, पिवळी नदी भाग, गमदूर फीडर लाईन
  सतरंजीपुरा झोन: बस्तरवारी १,२,३, शांती नगर, GH-वाहनठिकाणा व वांजरी जलकुंभ बाधित भागांत २७ तारखेला पाणीपुरवठा होणार नाही व २८ जून रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे मनपा व OCW यांनी वरील भागांतील नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

  येथे उल्लेखनीय आहे कि, उप्पलवाडी पुलाच्या जुन्या वर्तमान कॅरेजवे खाली ९०० मिमी पाण्याची वाहिनी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्या वाहिनीला पर्यायी वाहिनी उपरोक्त ठिकाणी टाकलेली आहे व त्याच्या आंतरजोडणीसाठी 24 तासांचे शटडाऊन आवश्यक आहे.

  जलवाहिन्यांच्या स्थानान्तरणासाठी पुलाचे बांधकामदेखील थांबले आहे. ज्यामुळे उप्पलवाडी येथे पावसाळ्यात पाणी साठण्याच्या समस्येची शक्यता आहे. वर्तमान जलवाहिनीमुळे नवीन सिमेंट रोडच्या बांधकामातदेखील अडथळा होत आहे.

  For more information about water supply consumers can contact OCW Helpline No 1800 266 9899.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145