Published On : Mon, Mar 26th, 2018

टिल्लू पंप लावणाऱ्यांची आता गय नाही

Advertisement


नागपूर: टिल्लू पंप लावणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिली. सोमवारी (ता.२६) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित जलप्रदाय समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

बैठकीला समिती उपसभापती श्रद्धा पाठक, समिती सदस्य प्रदीप पोहाणे, हरीश ग्वालबंशी, जयश्री रारोकर, प्रणिता शहाणे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना पिंटू झलके म्हणाले, शहरातील नागरिकांकडून दूषित पाण्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी नियोजनासाठी वेगळी टीम करण्यात यावी. ज्या ठिकाणी दूषित पाण्याची तक्रार येत असेल त्याठिकाणी तात्काळ स्थानिक नगरसेवकांची मदत घेऊन प्रशासनाने दौरा करावा, असे निर्देश त्यांनी दिले. उन्हाळा लक्षात घेता टँकरची संख्या वाढविण्यात यावी, असे निर्देश सभापती पिंटू झलके यांनी दिले. टँकरच्या उपलब्ध संख्येचा झोननिहाय आढावा यावेळी सभापतींनी घेतला. बोअरवेल दुरूस्ती व त्याची उंची वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. व्हॉल्व ऑपरेशनबाबत आढावा यावेळी सभापतींनी घेतला.

Advertisement
Advertisement

कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड यांनी अमृत योजनेची माहिती बैठकीत दिली. बैठकीला उपअभियंता दीपक चिटणीस, ओसीडब्ल्यूचे के.एम.पी.सिंग यांचेसह ओसीडब्लूचे अधिकारी व कर्मचारी, जलप्रदाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisementss
Advertisement
Advertisement
Advertisement