
नागपूर : मागील काही महिन्यांपासून शहरात कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांच्या घरातील पाणीमीटर तपासण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेकदा जीव मुठीत घेऊन काम करावे लागते. अशा पार्श्वभूमीवर एनएमसी-ओसीडब्ल्यू (NMC-OCW) यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, आपल्या पाळीव प्राण्यांना नियंत्रणात ठेवा आणि कर्मचारी परिसरात काम करत असताना त्यांना सुरक्षित अंतरावर बांधून ठेवा.
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी कुत्रे व्यवस्थित न बांधल्यामुळे मीटर रीडरना पाणीमीटरचा फोटो घेण्यात अडचणी येतात. काही ग्राहकांनी तर पाळीव कुत्रा असल्याचे नाकारले, परंतु त्या ठिकाणी मीटर रीडरला आत जाणे धोक्याचे असल्याने त्यांना कुत्र्याचा फोटो घेऊन नोंद ठेवावी लागली.
गेल्या सहा महिन्यांत तब्बल १३ कुत्रे चावल्याची प्रकरणे नोंदली गेली असून, संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ रुग्णालयात नेऊन उपचार आणि लसीकरण करण्यात आले आहे.
संस्था नागरिकांना आवाहन करत आहे की, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पूर्ण सहकार्य करावे. पाणीमीटर तपासणीच्या वेळी आपल्या पाळीव प्राण्यांना बांधून ठेवा आणि कामकाजासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्या.
आपल्या सहकार्यामुळेच शहराची जलपुरवठा व्यवस्था सुरक्षित आणि सुरळीत राहू शकते.
अधिक माहितीसाठी संपर्क NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक : 1800 266 9899 ई-मेल : contact@ocwindia.com यावर संपर्क करा.









