Published On : Sat, Jul 13th, 2019

खरसोलीच्या धर्तीवर जलसंधारणाची कामे करा : पालकमंत्री

Advertisement

-जिल्ह्यातील सर्व सरपंचांना आवाहन
-भूगावात झाले आरोग्य शिबिर
-आतापर्यंत 10 हजार रुग्णांना शिबिराचा लाभ

नागपूर: नरखेड तालुक्यातील खरसोली या गावातील नागरिकांनी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करून पाणीटंचाईवर मात करून दाखविली. खरसोलीच्या धर्तीवर जिल्ह्यातील सरपंचांनी आपापल्या गावात जलसंधारणाची कामे करून पाणीटंचाईवर मात करावी, असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भूगाव येथे केले.

श्रीश्री फाऊंडेशनतर्फे भूगाव येथे आज आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गरिबांना केवळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिरांचे आयोजन केले जात आहे. आजचे भूगावचे यशस्वी पाचवे शिबिर होते. यापूर्वी कोराडी, मौदा, गुमथळा, खापरी येथे आरोग्य शिबिरे झाली. आतापर्यंत पाच शिबिरांमधून 10 हजारांपेक्षा अधिक रुग्णांना या शिबिरात सहभागी होऊन विविध प्रकारच्या तपासण्या करून नि:शुल्क औषधोपचाराचा लाभ घेतला.

आजच्या शिबिरात फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संकेत बावनकुळे, सभापती अनिता चिकटे, रामकृष्ण वंजारी, रमेश चिकटे, अनिल निधान, राजकुमार धुले, चंदाताई आंबिलडुके, नाना आकरे, रामगाव डाबरे, रुख्माताई ढोबळे, विष्णु सावळे आदी उपस्थित होते.

मानवाचे आरोग्य पर्यावरणाशी जोडले आहे. निसर्गाचे आरोग्य चांगले असले तर मनुष्याचे चांगले राहील. निसर्गाचे आरोग्य चांगले राहण्यासाठ़ी पर्यावरणाचे रक्षण, वृक्षलागवड आणि जलसंधारणाची कामे ही आज आवश्यकता झाली आहे. याबद्दल आता मोठ्या प्रमाणात जनजागृतीही झाली आहे. पर्यावरण संतुलन व निसर्गाचे आरोग्य निरोगी राखण्यासाठ़ी लोकसहभागातून ही चळवळ राबविली पहिजे, असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.

आजच्या आरोग्य शिबिरात 2251 रुग्णांची नोंदणी झाली. डोळ्यांची तपासणी 525 रुग्णांनी, किडणीची 110 रुग्णांनी, ब्रेनची 90, मधुमेहाची तपासणी 197 जणांनी, रक्तदाबाची तपासणी 317 जणांनी, सामान्य तपासणी 170 जणांनी, 129 महिलांची स्त्री रोग तज्ञांनी तपासणी केली, 177 नागरिकांनी रक्त तपासणी करून घेतली. अशा विविध तपासणी या शिबिरात करण्यात आल्या. त्यासाठी 16 प्रकारचे काऊंटर सुरु करण्यात आले होते. प्रत्येक काऊंटरवर त्या रोगाशी संबंधित तज्ञ डॉक्टर उपलब्ध होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, जि.प. आरोग्य विभाग, आशा हॉस्पिटल व या चळवळीशी सक्रिय जोडल्या गेलेल्या अनेक खाजगी संस्थांच्या डॉक्टरांनी शिबिरात आपले योगदान दिले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी महेश बोंडे, राजेश गोल्हर, हर्षल हिंगणीकर, विकास धारपुडे, प्रीतम लोहासारवा, जितू लोहासारवा, कपिल गायधने, जितू मेरकुळे, प्रमोद ढोबळे, श्री श्री फाऊंडेशनचे सचिन घोडे, डॉ. वैभव कारेमोरे व अन्य कार्यकर्त्यांनी शर्थीची मेहनत घेतली.